‘वायु’ चक्रीवादळाची तीव्रता वाढली: गुजरातला सतर्क राहण्याचा इशारा-भारतीय नौदलाला सज्ज राहण्याचे आदेश

Date:

नवी दिल्ली, 12 जून 2019-अरबी समुद्रात घोंघावत असलेले ‘वायु’ चक्रीवादळ उत्तरेकडे ताशी 13 किलोमीटर वेगाने सरकत असून, उद्या सकाळी गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. पोरबंदर आणि महुवा दरम्यान वेरावळ परिसरातल्या किनारपट्टीवर हे वादळ धडकण्याची शक्यता असून, दि.13 जून रोजी सकाळी ताशी 145 ते 170 किमी. वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. यामुळे सौराष्ट्र आणि कच्छ परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात ताशी 70 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. या काळात समुद्र खवळलेला राहील. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, जुनागड, दीव, गिरसोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यातल्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाच्या वेळी दीड ते दोन मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.

भारतीय नौदलाला सज्ज राहण्याचे आदेश

पश्चिम नौदल कमांडच्या मुख्यालयाने वायु चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जलद प्रतिसादासाठी पुढील तयारी सुरु केली आहे.

  • राज्य प्रशासन, स्थानिक जिल्हा प्रशासन आणि भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून सावध करणाऱ्या सूचना देण्याचे तसेच खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश द्यायला सांगितले आहे.
  • नौदलाच्या जहाजांवर मानवी सहायता आणि आपत्ती मदत सामुग्री तैनात आहे.
  • समुद्रात कार्यरत असलेली भारतीय नौदलाची जहाजे आणि विमाने/हेलिकॉप्टर्सना समुद्रात मच्छिमारीसाठी गेलेल्या नौकांना किनाऱ्यावर परतण्याची सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • स्थानिक प्रशासनाला सहाय्य करण्यासाठी भारतीय नौदलाची बचाव पथके आणि मदत सामुग्री तयार ठेवणे.
  • आपतकालीन वैद्यकीय मदतीसाठी मुंबई स्थित अश्विनी या भारतीय नौदलाच्या रुग्णालयातल्या वैद्यकीय पथक आणि सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
  • पी8आय आणि आयएल विमाने शोध आणि बचाव मोहिमेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.
  • मुख्यालय, किनाऱ्यावरील संरक्षण आणि सल्लागार गटाने वायू चक्रीवादळबाबत किनारपट्टी प्रदेशांना सूचना जारी केल्या आहेत.

भारतीय नौदलाला सज्ज राहण्याचे आदेश

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहरातून नऊ गुंड तडीपार:पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांची कारवाई

पुणे- शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केट यार्ड परिसरात दहशत...

नागरिकांच्या जीवनात सकारात्क बदल घडविण्यावर महसूल विभागाचा प्रयत्न-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महसुली सेवा गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर भर महसूलमंत्र्यांच्या हस्ते...