नवी दिल्ली-
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 15ऑक्टोबर 2020 पर्यंत हॉटेल्स / रेस्टॉरंट्स बंद राहतील असा दावा करणारे खोटे पत्र पर्यटन मंत्रालयाच्या नावाखाली समाज माध्यमांवर फिरत असल्याचे आणि यामुळे संपूर्ण पर्यटन क्षेत्रात भिती निर्माण केली जात असल्याचे पर्यटन मंत्रालयाच्या निदर्शनाला आले आहे. “पर्यटन मंत्रालयाने असे कोणतेही पत्र दिलेले नाही” आणि अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांवर लोकांनी विश्वास ठेवू नये असे पर्यटन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. .
पीआयबी फॅक्टचेक वर देखील हे स्पष्ट करण्यात आले आहे.
पर्यटन मंत्रालयाने यापूर्वीच सोशल मीडियावर हे वृत्त फेटाळले असून मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. पीआयबी फॅक्ट चेक युनिटनेही काही दिवसांपूर्वी हे फेटाळले होते मात्र खोटे संदेश पुन्हा फिरत आहेत. पीआयबी फॅक्टचेकने काल पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे. सर्वांना विनंती केली आहे की त्यांनी अशा संदेशांकडे दुर्लक्ष करावे आणि केवळ अधिकृत निवेदनावर विश्वास ठेवावा.

