सर्व जीएसटी आणि कस्टम परतावे देखील देणार; एमएसएमईएस सह सुमारे 1 लाख व्यावसयिक संस्थांना याचा लाभ होणार
18000 कोटी रुपयांचा एकूण परतावा त्वरित मंजूर
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2020
कोविड-19 ची सद्यस्थिती पाहता आणि व्यवसायिक संस्था आणि व्यक्तींना त्वरित दिलासा मिळावा या उद्देशाने 5 लाख रुपयां पर्यंतचे प्रलंबित आयकर परतावे तत्काळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे 14 लाख करदात्यांना याचा लाभ मिळणार आहे.
सर्व प्रलंबित जीएसटी आणि कस्टम परतावे देखील देण्याचा निर्णय घेण्यात आला असून एमएसएमईएस सह सुमारे 1 लाख व्यावसयिक संस्थांना याचा लाभ होणार आहे. अंदाजे 18000 कोटी रुपयांच्या एकूण परताव्याला मंजूरी देण्यात आली आहे.

