प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना पैकेज : कोविड19 शी लढा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना

Date:

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न १. या योजनेअंतर्गत नेमके कोणते विमासंरक्षण मिळते?

या अपघात विमा योजनेअंतर्गत ;

  • कोविड-19 मुळे मृत्यू झाल्यास, आणि
  • कोविड19 शी संबंधित  कर्तव्य बजावत असतांना अपघाती मृत्यू झाल्यास.

प्रश्न २. अपघाताची व्याख्या काय?

अपघात म्हणजे, अचानक, अकस्मात आणि अभावित घडलेली घटना जी एखाद्या बाह्य, दृश्य अथवा हिंसक पद्धतीने घडली असेल.

प्रश्न ३. या योजनेअंतर्गत कोणा-कोणाला विमा संरक्षण मिळू शकेल?

  • सार्वजनिक आरोग्य सेवेतील कर्मचारी, ज्यात सामुदायिक आरोग्य कर्मचारी, ज्यांचा कोविड-19 च्या रुग्णांशी थेट संपर्क येतो आणि जे कोरोनाच्या रुग्णांची काळजी घेतात आणि ज्यामुळे त्यांच्या आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो.
  • खाजगी रुग्णालयातील कर्मचारी आणि निवृत्त/स्वयंसेवक/ स्थानिक स्वराज्य संस्था/ कंत्राटी कर्मचारी/ रोजंदारी कर्मचारी/ तात्पुरत्या सेवेतील कर्मचारी/ राज्य/ केंद्र सरकार/स्वायत्त संस्थांची रुग्णालये/ केंद्रशासित/ एम्स आणि आयएनआय/ मिशनरी रुग्णालये च्या रुग्णालयांनी कोविड19 शी संबंधित आरोग्यविषयक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी घेतलेले बाह्य कर्मचारी.

प्रश्न ४. या योजनेअंतर्गत कोण स्वयंसेवक म्हणून काम करु शकेल?

स्वयंसेवक म्हणजे असे लोक ज्यांना केंद्र/राज्य/अथवा केंद्रशासित प्रदेशातल्या सरकारी अधिकाऱ्यांनी कोरोनाच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी मनोनीत केले आहे आणि जे कोविडच्या रुग्णांच्या थेट संपर्कात येऊ शकतात.

प्रश्न ५.  या योजनेअंतर्गत येणाऱ्या “खाजगी व्यक्ती’ कोण?

  •  खाजगी व्यक्ती म्हणजे जे लोक सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सेवा संस्थांमध्ये एखाद्या एजन्सीच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आले आहेत. आणि ज्यांना कोरोनाच्या रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी देण्यात आली असून ते कोरोना रुग्णांच्या थेट संपर्कात आले आहेत.(मात्र त्यांच्याकडे या एजन्सीमार्फत संबंधित आरोग्य संस्थेकडे पाठवले गेल्याचा पुरावा असणे आवश्यक)

प्रश्न ६.  विमा संरक्षण केव्हा सुरु होते आणि केव्हा समाप्त होईल?

  • या विमा संरक्षणाचा कालावधी 90 दिवसांचा आहे, जो 30 मार्च 2020 ला सुरु होतो.

प्रश्न ७. या योजनेअंतर्गत संरक्षण मिळवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना काही वयोमर्यादा घालण्यात आली आहे का?

  • नाही, या योजनेसाठी काहीही वयोमर्यादा नाही.

प्रश्न 8 : या विम्यासाठी वैयक्तिक नोंदणी आवश्यक आहे का?

  • वैयक्तिक नोंदणी आवश्यक नाही.

प्रश्न 9 : या योजनेस पात्र ठरण्यासाठी व्यक्तीला काही हप्ते भरण्याची गरज आहे का?

  • नाही. या योजनेचा संपूर्ण खर्च भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाद्वारे केला जाणार आहे.

प्रश्न १० : विमाधारित व्यक्तीसाठी काय लाभ उपलब्ध आहेत?

  •  विमाधारित व्यक्तीने नॉमिनी म्हणून उल्लेख केलेल्या व्यक्तीला, 50 लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाईल.

प्रश्न 11 : या विम्याचा लाभ मिळवण्यासाठी कोविड-१९ ची प्रयोगशाळा चाचणी करणे अनिवार्य आहे का?

  • कोविडमुळे व्यक्तीचा मूत्यू झाला असल्यास, संबंधित व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचा अहवाल अनिवार्य आहे. मात्र, कोरोनासबंधित कर्तव्य बजावत असतांना अपघाती मृत्यू आल्यास, अशा रिपोर्टची गरज नाही.

प्रश्न 12 :   जर विमाधारकाला कोरोनाची लागण झाल्यास, त्याच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च देखील या विमायोजनेत समाविष्ट आहे का?

  • उपचार आणि विलगीकरणाशी संबंधित कोणतेही खर्च या विमा योजनेत समाविष्ट नाहीत.

प्रश्न 13 :  जर एखाद्या व्यक्तीचा वेगळा वैयक्तिक अपघात विमा किंवा आयुर्विमा असेल तर त्याचा या विम्याच्या दाव्यावर काय परिणाम होऊ शकेल?

  • एखाद्या व्यक्तीचा इतर कुठलाही वैयक्तिक विमा असेल, तरीही, त्याला या विम्याची पूर्ण रक्कम मिळणार असून, ती अतिरिक्त मदत असेल.

प्रश्न 14: या योजनेअंतर्गत विमा मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • कर्तव्यावर असल्याबाबत चा अर्ज ज्यावर विमा दावेदार किंवा नॉमिनीची स्वाक्षरी असेल.
  • मृत व्यक्तीचे ओळखपत्र ( स्वाक्षांकित प्रत)
  • दावेदार किंवा नॉमिनीचे ओळखपत्र (स्वाक्षांकित प्रत)
  • मृत व्यक्ती आणि दावेदारामधील नातेसंबंध स्पष्ट करणारा कागदोपत्री पुरावा(स्वाक्षांकित प्रत)
  • मृत व्यक्तीला कोविड-19 चा संसर्ग झाला असल्याचा रिपोर्ट (स्वाक्षांकित प्रत)
  • ज्या रूग्णालयात मृत्यू झाला, त्या रूग्णालयाकडून मिळालेला मृत्यू अहवाल. (मृत्यू रुग्णालयात झाला असल्यास) (स्वाक्षांकित प्रत)
  • मृत्यू दाखला (मूळ)
  • शवविच्छेदन अहवाल (स्वाक्षांकित प्रत)
  • काट मारलेला धनादेश ( ऐच्छिक) मूळ स्वरूपात
  • एफआयआर (स्वाक्षांकित प्रत)

10. मृत व्यक्ती संबंधित संस्थेची कर्मचारी/ अथवा कंत्राटी कामगार असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांच्या संस्था/ कार्यालये/ संघटनांचे प्रमाणपत्र, ज्यात संबंधित व्यक्तीचा कोरोनाशी संबंधित कर्तव्य बजावत असतांना मृत्यू झाला असल्याचा उल्लेख असायला हवा.

 

प्रश्न 15 : विम्याच्या रकमेसाठी कोणाशी संपर्क साधायचा?

विमाधारक व्यक्ती ज्या संस्थेत अथवा त्या संस्थेशी संपर्क साधायला हवा. विमा कंपनीच्या इमेलवरही संपर्क साधू शकता.

प्रश्न 16 :  दाव्यासाठीची प्रक्रिया काय आहे?

  • विम्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने आपल्या दाव्याचा फॉर्म भरण्याची आणि सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून तो फॉर्म संबंधित संस्था/संघटना किंवा एजन्सीकडे सोपवायला हवा.
  • संबंधित संस्था यासंदर्भात आवश्यक ती प्रमाणपत्रे देऊन हा दाव्याचा फॉर्म संबंधित अधिकारी/कार्यालये यांच्याकडे पाठवेल.
  • संबंधित अधिकारी हा फॉर्म विमा कंपनीकडे मंजुरीसाठी पाठवेल.

प्रश्न 17: विमा कंपनीत कोणाकडे संपर्क साधायचा?

Divisional office CDU 312000 of The New India Assurance Co.Ltd. located at B-401,          Ansal Chambers 1, Bhikaji Cama Place, New Delhi-110066.

संपर्क व्यक्ती :

  • श्रीमती सारिका अरोरा, विभागीय व्यवस्थापक,
  • श्री रवी राव, उप व्यवस्थापक
  • श्री योगेंद्र सिंग तन्वर
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...