पुणे-
‘फोटोकॉपी’ हा सिनेमा म्हणजे माझी परीक्षा आणे मी निर्माती म्हणून दिलेली हि परीक्षा त्यात पास होते कि नाही ? किती गुण मिळतील ? हे हा सिनेमा प्रदर्शीत झाल्यावरच रसिकांच्या कडून मला समजेल असे येथे निर्मात्या बनलेल्या गायिका नेहा राजपाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
व्हायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि नेहा राजपाल प्रॉडक्शन प्रस्तुत ‘फोटोकॉपी’ या सिनेमाची कथा ओमकार मंगेश दत्त आणि डॉ. आकाश राजपाल यांनी लिहिली असून विजय मौर्य यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमाची पटकथा तसेच संवाद विजय मौर्य आणि योगेश जोशी या दोघांनी मिळून लिहिले आहेत. पर्ण आणि चेतन या जोडीसोबतच वंदना गुप्ते आणि अंशुमन जोशी हे देखील सिनेमात पाहायला मिळणार आहे.हा सिनेमा येत्या १६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सिनेमाचे ‘तू जिथे मी तिथे’ हे प्रेमगीत सोशल साईटवर प्रदर्शित करण्यात आले. अश्विनी शेंडे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला निलेश मोहरीर यांचे दिग्दर्शन लाभले आहे. शिवाय, स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल या दोन गोड गाळ्यांच्या जोडीने हे गाणे गायले आहे. पुण्यातील लवासा येथील प्रशस्त आणि अल्हादायी वातावरणात चित्रित केले गेलेल्या या गाण्याचा तजेला प्रेक्षकांना मदमस्त करणारा ठरत आहे. तसेच पर्ण पेठे आणि चेतन चिटणीस या फ्रेश जोडींवर आधारित असलेले हे फ्रेश गाणे तरुणांईंना भुलावत आहे.

