मुंबई-आज शुक्रवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 80 पैशांनी तर डिझेलच्या दरात 75 पैशांनी वाढ केली आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. सततच्या इंधन दरवाढीमुळे गेल्या चार दिवसांत पेट्रोल तब्बल 2 रुपये 40 पैशांनी महागले आहे. आता मुंबईत पेट्रोल 112.51 रुपये/लिटर आणि डिझेल 96.70 रुपये/लिटर मिळणार आहे. मागील 4 दिवसांत पेट्रोल-डिझेलमध्ये झालेली हि तिसरी दरवाढ आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील आजचे पेट्रोलचे दर (प्रति लिटर रुपयांमध्ये)
- मुंबई – 112.51
- पुणे – 112.37
- नाशिक – 112.90
- औरंगाबाद – 114.17
- जळगाव – 113.81
- सोलापूर – 112.27
- नागपूर – 112.22
- परभणी – 115.70
महाराष्ट्रालाच सर्वाधिक फटका
देशभरातील महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहे. तसेच, राज्यातील शहरांमध्येही पेट्रोल सर्वाधिक महागडे आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांना या दरवाढीची सर्वाधिक झळ बसणार आहे. देशभरात पेट्रोलचे दर 97 ते 98 रुपयांच्या आसपास आहे. मात्र, मुंबईसह राज्यातील सर्व शहरांमध्ये पेट्रोलचे प्रतिलिटर दर 112 रुपयांच्या पुढे गेले आहे. आज झालेल्या दरवाढीनंतरही दिल्लीत पेट्रोल 97.81 रुपये/लिटर आणि डिझेल 89.07 रुपये/लिटर मिळत आहे. तर अहमदाबादमध्ये पेट्रोल 97.52 रुपये/लीटर आणि डिझेल 91.61 रुपये/लीटर झाले आहे. या शहरांमध्ये पेट्रोलचे दर राज्यातील दरापेक्षा 3 रुपयांनी कमी आहे.गेल्या 3 वर्षांत पेट्रोल आणि डिझेलवरील करातून सरकारला कोट्यवधींची कमाई झाली आहे. तुम्ही तुमच्या कारमध्ये 100 रुपये किमतीचे पेट्रोल टाकल्यावर त्यातील 52 रुपये टॅक्स म्हणून सरकारच्या खिशात जातात. महाराष्ट्रात, जास्तीत जास्त 52.50 रुपये (100 पैकी) कर म्हणून गोळा केले जातात. दुसरीकडे, जर दिल्लीत 100 रुपयांचे पेट्रोल भरले, तर त्यातील 45.3 रुपये सरकारकडे जातात.

