अभ्यासासोबतच व्यक्तिमत्व विकास महत्त्वाचा: डॉ. सागर डोईफोडे IAS (CEO, State Health Agency)

Date:


पुणे : चाटे शिक्षण समूह पुणे विभाग यांच्या वतीने आज १०वी ११वी व १२वी या विद्यार्थ्यांसाठी डोडा काश्मीर चे माजी कलेक्टर डॉक्टर सागर डोईफोडे यांचा आज मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चाटे शिक्षण समूहाचे पुणे विभागाचे संचालक प्रा.फुलचंद चाटे यांनी गेल्या एक महिन्यापासून प्रत्येक रविवारी जे चाटे शिक्षण समूहाचे विद्यार्थी आज देश- विदेशामध्ये विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीरित्या कार्यरत आहेत यांच्या वतीने प्रत्येक रविवारी या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला जातो, आज डॉक्टर सागर डोईफोडे हे काश्मीर मधून झूम मीटिंगद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते यावेळेस सागर डोईफोडे यांनी मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की विद्यार्थी घडत असताना आठवी नववी दहावी अकरावी बारावी हे वर्ष खूप महत्त्वाचे असतात कारण विद्यार्थ्यांचा पाया हा आठवी नववी दहावी अकरावी बारावी मधेच तयार होत असतो जरी विद्यार्थी यावेळेस सिरीयस नसले, अभ्यासाविषयी फारसे जागरूक नसले तरीसुद्धा त्यांच्या घरांमध्ये जे संस्कार पेरले जातात आई वडील जे संस्कार करत असतात आई-वडील जे प्लॅन करून देतात त्या पद्धतीने मुलाने चालणे खूप गरजेचे आहे यानुसार डॉक्टर सागर डोईफोडे यांनी सांगितले की ज्यावेळेस स्वतःच्या जीवनाचा प्रवास करत असताना त्यांनी सांगितले की मी एका छोट्याशा खेडेगावातून  पुण्यासारख्या शहरात येऊन दहावी अकरावी बारावी हे शिक्षण ज्यावेळेस घेतले त्यावेळेस शिक्षण घेत असताना  मला स्वतःचे करिअर काय असते किंवा क्षेत्र निवडत असताना हे कोण कोणत्या क्षेत्रात घडवायचे आहे हे फक्त माझ्या आईवडिलांनी आणि शिक्षकांनी माझ्या मनावर बिंबवले चाटे शिक्षण समूहांमध्ये शिक्षण घेत असताना ज्यावेळेस अभ्यासाची गोडी काय असते अभ्यास कसा केला पाहिजे विद्यार्थी एक माणूस कसा घडला पाहिजे आई-वडिलांच्या स्वप्नांचा विसर न पडला पाहिजे या सर्व गोष्टी मला चाटे शिक्षण समूहामध्ये शिकावयास मिळाल्या असे त्यांनी आवर्जून सांगितले .
                   डॉक्टर सागर डोईफोडे यांनी पुढे सांगितले की ज्यावेळेस विद्यार्थी घडत असतो त्यावेळेस पालकांचा रोल त्याच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो पालक ज्या पद्धतीने प्लॅन करून देत असतात पालक ज्या पद्धतीने सांगत असतात पालकांकडे खूप मोठा अनुभव असतो परंतु बऱ्याच वेळेस  ही मुले आपल्या आई-वडिलांचे ऐकत नसतात ते एका वेगळ्या गोष्टींमध्ये अट्रॅक्शन तयार करत असतात अशा बऱ्याचशा गोष्टी आहे यामध्ये विद्यार्थी अडकत बसतो आणि म्हणून विद्यार्थ्याने बाकीच्या गोष्टी पासून दूर राहणे खूप गरजेचे आहे.
               आज या काळामध्ये विद्यार्थ्यांसमोर एवढे प्रलोभन आहे यापासून विद्यार्थ्याने खूप दूर राहणे गरजेचे आहे असे यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितले . यावेळेस प्राध्यापक फुलचंद चाटे यांनी त्यांना प्रश्न विचारला की सागर तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या आई वडिलांचे महत्त्व किती आहे किंवा तुला आई-वडिलांनी जे संस्कार दिले आहेत जे मार्गदर्शन केले आहे प्रत्येक वेळेस तुझी आई विशेषतः तुझी खूप मोठी गुरु आहे की त्यांनी तुला घडविण्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत आणि वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे, त्यावेळेस ,आईची आणि वडिलांची आठवण काढल्यानंतर सागर यांच्या डोळ्यात पाणी आले की आई-वडिलांचा रोल किती महत्त्वाचा असतो मी आज या पदावर जो आहे तो फक्त आई-वडिलां मुळेच आहे त्याने आवर्जून सांगितले’ म्हणून विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टी करत असताना आई वडिलांचे महत्व असेल किंवा अभ्यासाचे महत्त्व असेल आणि त्यासोबतच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट की आपण स्वतः कसे बोलतो कसे चालतो कोणासोबत राहतो कोणत्या पद्धतीचे ज्ञान घेतो कोणती पुस्तके वाचतो या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात यावेळी जे आहे की महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारले. एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता की ज्यावेळेस तुमचे आयएएस इंटरव्यू झाला होता त्या वेळेस तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते त्यावेळेस त्यांनी शेवटी सांगितले की ज्या वेळेस मला सर्व प्रकारचे प्रश्न विचारले त्यावेळेस मी सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि ज्या वेळेस मी बाहेर निघालो त्यावेळेस चेअरमन नी समोरून सांगितले की मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे आणि शेवटी त्याने मला प्रश्न विचारला की तुम्ही डॉक्टर आहात बीडीएस आहात आणि मग त्यांनी त्या फिल्डमधील प्रश्न विचारला परंतु तो प्रश्न मी याच्या अगोदर कधी वाचला नव्हता असे सागर डोईफोडे यांनी सांगितले आणि त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केले की नाही मी हे कधी आधी वाचले नाही त्यावेळेस समोरून चेअरमन नी विचारले की तुम्ही हा प्रश्न कधी वाचला असेल पण तुम्ही हा प्रश्न विसरला असाल त्यावेळेस मी विश्वासाने सांगितले की नाही मी वाचला नाही किंवा माझ्या पाहण्यात पण आला नाही आणि वाचला पण नाही आणि तेथून मी पुढे बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मी त्यावेळेस इंटरनेटला हा प्रश्न सर्च केला त्यावेळेस याचे उत्तर बघितले आणि त्यावेळेस कळाले की तो प्रश्न त्या फिल्ड मधला नव्हता तो मुद्दाम चेअरमन ने हा प्रश्न चुकीचा विचारला जेणेकरून तिथे त्याची पूर्ण कार्यक्षमता काय आहे किंवा विचार करण्याची क्षमता काय आहे ही समजावी म्हणजे त्यावेळेस सागरने प्रामाणिकपणे सांगितले की हा प्रश्न कधी वाचलेला नाही म्हणजे प्रामाणिकतेला किती महत्त्व आहे सत्यतेला किती महत्त्व आहे हे   सागर डोईफोडे यांच्या बोलण्यातून वागण्यातून दिसून आले आहे आणि म्हणून त्यांना  पुढे ती संधी चांगली मिळाली. यावेळेस प्राध्यापक फुलचंद चाटे सरांनी शेवटी सांगितले की विद्यार्थ्यांनो तुम्हाला सुद्धा पुढे अशा प्रकारचे आयएएस बनायचे आहे आम्हाला चाटे शिक्षण समूहाला जे आम्ही विद्यार्थी घडवत आहोत हे सर्व विद्यार्थी आम्हाला अशा प्रकारचे बनवायचे आहे. देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात विद्यार्थी गेला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि म्हणूनच चाटे शिक्षण समूह पुढेही असेच कार्य करत राहिल असे यावेळी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजित पवारांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय?:रात्री उशिरा आमदारांची सुनेत्रा पवारांशी खलबतं; राष्ट्रवादीत हालचालींना वेग

मुंबई-राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर या...

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

पुणे, दि. 4 मार्च: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे...

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ४ मार्च २०२६.राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत...

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे- आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा...