लोकसेवाच्या सर्व शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल क्लासेस’द्वारे शिक्षण

Date:

पुणे, दि. 14 एप्रिल : लोकसेवा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या लोकसेवा ई-स्कूल पाषाण आणि फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल, लोकसेवा फार्मसी कॉलेज आणि नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांची सैनिकी शाळामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्हर्च्युअल क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम सुरु आहे. विद्यार्थी त्यांच्या घरुन या व्हर्च्युअल क्लासमध्ये सहभागी होतात. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि घरी असताना त्यांचा दिनक्रम कायम राहावा यासाठी या ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासेसच्या माध्यमातून वर्ग सुरु असल्याची माहिती संबंधीत प्राचार्यांनी दिली.

झूम क्लाऊड अपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लॉगिंग आयडी दिला जातो आणि एका ठराविक वेळेत विद्यार्थ्यांचा ऑनलाईन वर्ग भरतो. यामध्ये प्राध्यापक संबंधीत विषय शिकवतात आणि विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या तर, ते थेट प्रश्न विचारतात. यासोबतच विद्यार्थ्यांना होमवर्क व असायन्मेंट्स दिल्या जातात. तेदेखील ऑनलाईन पाठविले जाते. व्हॉट्सअप व ईमेलचा यासाठी वापर केला जातो. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठीचे साहित्यदेखील ऑनलाईनच पाठविले जाते, अशी माहिती लोकसेवा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक विभागाच्या संचालिका निवेदिता मडकीकर, लोकसेवा ई-स्कूलचे प्राचार्य डॉ. राजीव सेनगुप्ता, लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्या रश्मी शुक्ला, लोकसेवा फार्मसी कॉलेजचे प्रा. नरहरी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांची सैनिकी शाळेच्या प्राचार्या ज्योती आरडे यांनी दिली.

लोकसेवा ई-स्कूलमध्ये सर्व वर्गांचे ऑनलाइन व्हर्च्युअल क्लास होत असून लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल व नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांच्या सैनिकी शाळेत नववी व दहावीच्या वर्गांचे व्हर्च्युअल क्लासेस होत आहेत. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना फार्मसी कौन्सिलने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ऑनलाईन मार्गदर्शन केले जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...