यापुढे कोणत्याही बंदमध्ये व्यापारी दुकाने बंद ठेवणार नाहीत- पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचा निर्णय

Date:

पुणे-देशात सध्या आर्थिक मंदीचं वातावरण आहे. अगोदरच ऑनलाईन मार्केटमुळे अडचणीत आलेला व्यापारी मंदीमुळे तर, संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत कोणत्या ना कोणत्या राजकीय अथवा सामाजिक संघटनेच्या वतीनं बंद पुकारला जातो. आणि व्यापारी वर्गाला यामुळे मोठी आर्थिक झळ बसते. त्यामुळे यापुढे कोणत्याही पक्ष व संघटनांनी पुकारलेल्या बंदमध्ये व्यापारी सहभागी होणार नाही, असा निर्णय पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे घेण्यात आला आहे. तसेच, बंद व इतर काळात व्यापाऱ्यांना भयमुक्त व्यापार व उद्योग करता यावा अशी कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावी, अशी विनंती राज्यकर्ते व पोलीस प्रशासनाला आहे, असे पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी कळविले आहे.
राजकीय व सामाजिक संघटनांकडून पुकारला गेलेला बंद बरोबर आहे की चूक यामध्ये आम्हा व्यापारी वर्गाला पडायचं नाही. आमच्या भावना या बंद पुकारणाऱ्यांसोबत निश्चित असतील. परंतु, त्यासाठी दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याची सक्ती त्यांनी करु नये ही अपेक्षा आहे.
आणि म्हणूनच पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे हा निर्णय घेण्यात येत आहे की, यापुढे कोणत्याही बंदमध्ये व्यापारी वर्ग त्यांची दुकाने बंद ठेवणार नाहीत. पोलिसांनी यासंदर्भात व्यापाऱ्यांना संरक्षण द्यावे. व्यापारी हा दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार करतो. त्यामुळे दुकाने बंद ठेवून सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम यापुढे व्यापारी करणार नाही.
व्यापाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्गणी, खंडणी, बंद याच कारणांमुळे व्यापाऱ्यांवर हल्ले होत आहेत. याची गंभीर दखल राज्यकर्ते आणि पोलीस प्रशासनाने घ्यावी, अशीही विनंती यानिमित्ताने करीत आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रभाग व क्षेत्रीय कार्यालयनिहाय आपत्ती  व्यवस्थानाची टीम करा

कर्मचाऱ्यांना ‘एनडीआरएफ’ मार्फत प्रशिक्षण द्या महापौर मंजूषा नागपुरे यांच्या प्रशासनाला सूचना आपत्ती...

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...