ग्रामपंचायती व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज : सचिन निवंगुणे

Date:

पुणे: व्यापाऱ्यांवरील हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे. उपनगरांमध्ये व्यापाऱ्यांची संख्या वाढत असून शहरांजवळील गावांमध्येही व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामपंचायत आणि व्यापारी संघटना एकत्र येऊन व्यापाऱ्यांची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चांगले काम करु शकतात आणि त्यातून व्यापाराला चालना मिळून संबंधीत परिसराचा विकास होण्याचे काम होईल, असे प्रतिपादन पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी केले.

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ व अखिल सूसगाव व्यापारी संघटनेच्या वतीने व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवंगुणे बोलत होते. याप्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे, सूस व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शरद भोते, कार्याध्यक्ष भरत चौधरी, माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे, उपसरपंच अनिकेत चांदेरे, रिटेल व्यापारी संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सोमाराम राठोड, सचिव नवनाथ सोमसे, उपाध्यक्ष सुनील गेहलोत, सूस व्यापारी संघटनेचे सचिव तुषार पोतले, उद्योजक सुनील चांदेरे, नारायण चांदेरे, अजित चंगेडिया, कैलास डांगी आदी मान्यवर आणि व्यापारी उपस्थित होते.

 

सूसमध्ये व्यापाऱ्यांची संख्या वेगाने वाढली आहे. नागरिकरण होत असल्याने संबंधीत व्यापाराच्या दृष्टीने व्यापारी येतात. यामुळे गावचा व परिसराचा विकासच होत असतो. व्यापारी सेवा देत असतात त्यामुळे त्यांना होणारा त्रास हा विकासाला खिळ घालणारा आहे. त्यामुळे सूस ग्रामपंचायत ही व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव पुढाकार घेईल, असे माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे व उपसरपंच अनिकेत चांदेरे यांनी सांगितले.

 

व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची आवश्यकता आहे. स्वतःच्या संरक्षणाबरोबरच घडलेल्या घटनेच्या तपासासाठीही कॅमेरा महत्त्वाचा ठरत आहे. याबरोबरच व्यापाऱ्यांनी होणाऱ्या त्रासाबद्दल पोलिसांकडे तक्रार दिली पाहिजे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड यांनी सांगितले.

 

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...