डॉ. गणेश देवी व डॉ. सुरेखा देवी यांना महापालक राष्ट्रीय सन्मान; प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना संस्थापालक सन्मान देऊन गौरविण्यात येणार

Date:

पुणे : ‘डीपर’, ‘सर फाउंडेशन’ व ‘साद माणुसकीची’ या शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतर्फे येत्या शनिवार व रविवारी (27 व 28 जुलै) शैक्षणिक व सामाजिक विषयांवर विचारमंथन होणार आहे. या दोन दिवसाच्या कार्यक्रमांत प्रसिद्ध विचारवंत व भाषा संवर्धनासाठी कार्यरत असलेले डॉ. गणेश देवी व डॉ. सुरेखा देवी यांना महापालक राष्ट्रीय सन्मान तर, मराठवाडा मित्रमंडळ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष व विद्यार्थी सहाय्यक समितीचे विश्वस्त प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांना संस्थापालक सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती ‘डीपर’, ‘सर फाउंडेशन’ व ‘साद माणुसकीची’चे संस्थापक अध्यक्ष हरीश बुटले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

महापालक राष्ट्रीय सन्मानचे हे सातवे वर्ष असून संस्थापालक सन्मानचे हे चौथे वर्ष आहे. येत्या 27 जुलै (शनिवार) रोजी संस्थापालक व 28 जुलै (रविवार) रोजी महापालक राष्ट्रीय सन्मान वितरण समारंभ पुण्यातील कोथरुडमधील जे पी नाईक ट्रेनिंग सेंटरमध्ये सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. शनिवारी (27 जुलै) होणाऱ्या संस्थापालक सन्मान समारंभास सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार व ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक उपस्थित असणार आहेत. तर, रविवारी (28 जुलै) महापालक राष्ट्रीय सन्मान समारंभास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस आणि राज्यसभा खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर उपस्थित असणार आहेत.

डॉ. गणेश देवी यांनी आदिवासींसाठी व भाषा संवर्धनासाठी असामान्य असे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांची यंदाच्या महापालक राष्ट्रीय सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्रासहित सन्मानचिन्ह आणि सौभाग्यलेणं असे आहे. यापूर्वी हा सन्मान डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. कुमार आणि डॉ. उर्मिला सप्तर्षी, डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे, दिलीप व सुनीता अरळीकर, डॉ. राजाभाऊ व रेणुताई दांडेकर आणि भारताचे जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा आणि मीना सिंह यांना प्रदान करण्यात आला आहे.

संस्थापालक सन्मानासाठी अतिशय निस्पृहपणे संस्थेचे पालकत्व निभावणाऱ्या व्यक्तीची निवड केली जाते. यावर्षीच्या सन्मानासाठी निवड झालेले प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी मराठवाडा मित्र मंडळ व विद्यार्थी सहाय्यक समिती या संस्थांसाठी अतिशय भरीव कार्य केले आहे. या पुरस्काराचे स्वरुप 51 हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे आहे. यापूर्वी हा सन्मान नाशिक जिल्हा प्रसारक समाजाच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार, लातूर पॅटर्नचे जनक प्राचार्य अनिरुद्ध जाधव, वरोऱ्याच्या ज्ञानदा वसतिगृहाचे संस्थापक मधुकरराव उपलेंचवार यांना प्रदान करण्यात आला आहे.

दोन दिवसांच्या या कार्यक्रमामध्ये विळखा पाणी प्रश्नाचा या विषयावर महाचर्चा आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी (27 जुलै) सकाळी 10 ते 2 पर्यंत ही महाचर्चा होणार असून यामध्ये शिरपूर पॅटर्नचे सुरेश खानापूरकर, जलयुक्त शिवारचे चंद्रकांत दळवी, हिवरेबाजारचे पोपटराव पवार, जनकल्याण समितीचे नंदकिशोर नातू, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, जलबिरादरीचे सुनील जोशी, राळेगणसिद्धी प्रकल्पाचे अॅड. श्याम असावा, पाणी फाउंडेशनचे नामदेव ननावरे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. संदीप शिरखेडकर, नाम फाउंडेशन कर्नल (नि) सुरेश पाटील, जलसंवादचे संपादक डॉ. दत्ता देशकर, निवृत्त सचिव दि. मा. मोरे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुधीर भोंगळे, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, सहज जलबोधकार उपेंद्र धोंडे आणि मानवलोकचे अनिकेत लोहिया सहभागी होणार आहेत.

डीपर, सर फाउंडेशन आणि साद माणुसकीची अॅवॉर्ड्सचे वितरण शनिवारी (27 जुलै) दुपारी 2.45 वाजता होणार आहे. यामध्ये डीपर आणि महाएक्झाम मधील राज्यातील गुणवत्ता यादीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान होणार आहे. यावेळी शिरपूर पॅटर्नचे सुरेश खानापूरकर आणि सामाजिक कार्यकर्ते श्याम मानकर उपस्थित राहणार आहेत. तसेच, स्वर्गीय प्रा. अनिल देशमुख पहिला स्मृती सन्मान डीपर आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ मुंबई येथील शिक्षक कार्यकर्ते व ए. व्ही. पटेल कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मयुर मेहता यांना यावेळी प्रदान करण्यात येणार आहे.

सहसंवाद : कृतार्थ सहजीवनाचा हा सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ बारगजे व संध्या बारगजे यांचा कार्यक्रम शनिवारी (27 जुलै) दुपारी 4.15 वाजता होणार आहे. आणि सायंकाळी 8 वाजता संगीत व गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.

रविवारी (28 जुलै) सकाळी 7.30 वाजता आपत्ती व्यवस्थापन विषयावर अशोक रोकडे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. सकाळी 8.15 वाजता युवा कार्यकर्ता संवाद व प्रशिक्षण होणार असून सामाजिक कार्यकर्ते किशोर देशपांडे युवकांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये रयत सेवक संघाचे प्रशांत खांडे पाटील, आकार फाउंडेशनचे राम वाघ, अनाम प्रेमचे अजित कुलकर्णी, ज्ञानदीप संस्थेचे आनंदा थोरात, सोशल नेटवर्कींग फोरमचे प्रमोद गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 10.30 वाजता शैक्षणिक व्यवस्थेची पूनर्बांधणी याविषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज, सामाजिक कार्यकर्ते किशोर देशपांडे, सिस्कॉमचे राजेंद्र धारणकर, शिक्षणतज्ज्ञ रेणुताई दांडेकर, विज्ञानाश्रमाचे योगेश कुलकर्णी, शिक्षणतज्ज्ञ अभिजीत पाटील, सुधीर दाणी, अभ्यासक प्राचार्य डॉ. चंद्रकांत रागीट, श्यामची आई फाउंडेशनच्या शीतल बापट आणि आयआयटी प्रतिष्ठानचे दुर्गेश मंगेशकर सहभागी होणार आहेत.

याबरोबरच कार्यकर्त्यांचे अनुभवकथन, कार्यकर्ता संवाद, पुढील वाटचाल यासंबंधी कार्यक्रमही होणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील दिग्ग्ज मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. महापालक राष्ट्रीय सन्मान व संस्थापालक सन्मान समारंभाबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक घडामोडी व विकासासंदर्भातील परिसंवादाचेही आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे, असेही हरीश बुटले यांनी यावेळी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...