पुण्याच्या विकासप्रकल्पांना अधिक वेगाने पूर्णत्वास न्या-

Date:

खासदार काकडेंनी नवनियुक्त पालकमंत्र्यांना भेटून दिल्या शुभेच्छा!

पुणे : पुण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाची घोषणा होताच भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी आज मुंबईत त्यांची भेट घेतली. नवनियुक्त पालकमंत्र्यांना शुभेच्छा देतानाच पुणे शहर व परिसराशी संबंधीत असलेल्या चोवीस तास समान पाणी पुरवठा योजना, नदीसुधार योजना, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक आणि पीएमआरडीए संबंधीत विकास प्रकल्पांना अधिक वेगाने पूर्णत्वास नेण्यासंदर्भात पालकमंत्री पाटील यांच्याकडे खासदार काकडे यांनी विनंती केली.

पुणे शहराच्या संदर्भात चोवीस तास पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा व जिव्हाळ्याचा राहिला आहे. मेट्रोचे काम सुरु असले तरी ते अधिक वेगाने पूर्णत्वास नेण्याची आवश्यकता आहे. मुळा व मुठा नदीसुधार कार्यक्रम राबविण्याबरोबरच शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि पीएमआरडीए संदर्भातील विकास प्रकल्पांना अधिक वेगवान करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राधान्य द्यावे. त्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी संबंधीत अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक बोलवावी अशी विनंतीही खासदार काकडे यांनी पालकमंत्री पाटील यांना या भेटीदरम्यान केली आहे. त्यावर पदभार स्वीकारताच आपण या कामांसंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले.

महाराष्ट्रात 2014 मध्ये भाजपप्रणित महायुतीचे सरकार आल्यानंतर पुण्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश बापट यांनी काम पाहिले. बापट हे खासदार झाल्यामुळे त्यांनी मंत्रिपद व आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आज पुण्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा झाली. त्यानंतर खासदार संजय काकडे यांनी नवनियुक्त पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देतानाच पुण्याच्या विकासप्रकल्पांना गतिमान करून पूर्णत्वास नेण्यासंदर्भात विनंती केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

पुणे, दि. 4 मार्च: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे...

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ४ मार्च २०२६.राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत...

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे- आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा...

मुळा-मुठा नदी प्रदूषणाविरोधात ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचा एल्गार

नदीपात्रात अवैध कचरा टाकण्याविरोधात विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंदोलन; आगी व...