प्लास्टिक बंदीसाठी कारवाई-रिटेल व्यापारी संघाच्या वतीने महापालिकेचा निषेध

Date:

पुणे, दि. 4 मे : प्लास्टिक बंदीसाठीच्या कारवाईने पुन्हा एकदा डोकं वर काढले असून शहरात आज महापालिकेकडून दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. परंतु, ही कारवाई बेकायदेशीर असून दंड वसूल करण्याच्या हेतुने प्रेरित होती, असा आरोप पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच, या कारवाईचा आम्ही जाहीर निषेध करीत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी सांगितले.

शहरातील कात्रज, धनकवडी, चंदननगर, सिंहगड रस्ता परिसरातील दुकानदारांवर प्लास्टिक बंदीबाबत  कारवाई करण्यात आल्याची माहिती निवंगुणे यांनी दिली. ते म्हणाले की, प्लास्टिक पिशव्यांचा वापर किरकोळ दुकानदारांकडून कमी झाला आहे. मात्र, रस्त्यावरील विक्रेत्यांकडून त्याचा वापर होत आहे. असे असताना महापालिकेकडून केवळ दंडाची रक्कम गोळा करण्याच्या हेतुनेच किरकोळ दुकानदारांना लक्ष्य केले जात आहे. चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणाऱ्यांवर जरुर कारवाई करावी परंतु बेकायदेशीरपणे अन्यायकारक कारवाईस आमचा विरोध आहे.

बिबवेवाडीतील एका दुकानदारांवर कारवाई करताना त्याचा वजनकाटा जप्त करण्यात आला. हे कोणत्या कायद्यात बसते असा सवालही व्यापारी विचारत आहेत. संघटनेच्या पातळीवर प्लास्टिक बंदीबाबत जागृती करीत असतानाच त्याचा पूनर्वापर व त्यापासून वस्तू तयार करण्याचे काम सुरु आहे. सकारात्मक भूमिकेत किरकोळ व्यापारी व दुकानदार असताना त्यांच्यावर अशा प्रकारे चुकीची कारवाई होऊ नये हीच अपेक्षा आहे, असेही निवंगुणे म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

पुणे, दि. 4 मार्च: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे...

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ४ मार्च २०२६.राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत...

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे- आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा...

मुळा-मुठा नदी प्रदूषणाविरोधात ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचा एल्गार

नदीपात्रात अवैध कचरा टाकण्याविरोधात विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंदोलन; आगी व...