लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी तारतम्य बाळगावे -आ. चंद्रकांतदादा पाटील
पुणे- महापालिकेतील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात कोरोना काळात वाढत चाललेल्या संघर्षावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या दोहोंनी तारतम्य बाळगण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले .आज बावधन बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 येथे नगरसेवक किरण दगडे पाटील आणि सरपंच पियुषा दगडे पाटील यांनी उभारलेल्या कोविड रुग्णांच्या २५ ऑक्सिजन बेड च्या सेंटर चे लोकार्पण आ. पाटील यांच्या हस्ते आणि आ. भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत करण्यात आले
या प्रसंगी भा.ज.पा. जिल्हा संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, नगरसेवक श्री. दिलीप वेडे पाटील,नगरसेविका अल्पना वरपे,नगरसेविका डॉ.श्रद्धा प्रभुणे – पाठक,सौ. पल्लवी वैद्य, उद्योजक आशिष धुत , सर्व डॉक्टर,नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.या ठिकाणी दगडे पाटील यांनी शाळेच्या पहिल्या मजल्यावर ४० बेड चा विलगीकरण कक्ष सुरु केलेला आहे आता तळमजल्यावर २५ बेड चे कोविड ऑक्सिजन सेंटर सुरु होत आहे.