मुंबई – भाजपची धोरणे आपल्याला 2019च्या निवडणुकांमध्येच लक्षात आले. भाजपला प्रादेशिक पक्ष आणि मित्र पक्षाला संपवण्यात अधिक रुची आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
यावेळी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी वेळीच निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी नितीशकुमारांचे अभिनंदन केले.
मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुशंगाने उद्धव ठाकरेंनी यांनी आज माजी नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेतून ज्या आमदार-खासदरांनी बंडाची भूमिका घेतली त्यांच्यावर पक्षप्रमुखांनी उघडपणे बोलले आहेत. ज्यांनी शिवसेनेबाबत गद्दारी आणि माझ्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना जनता स्वीकारणार नाही. ज्यांनी शिवसेनेसोबत अशा प्रकारचे कृत्य केले त्यांचे राजकीय भवितव्य काय हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार हे निवडुण येऊ शकत नाहीत. त्यांच्या भूमिकेकडे लक्ष न देता शिवसेना पक्ष संघटन आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सदस्य नोंदणीला प्राधान्य देण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.
मागच्या निवडणूकीत मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपा हे एकमेकांच्या विरोधात लढले होते. तेव्हाही शिवसेना जिंकली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्येही असेच चित्र राहिल. त्यासाठी स्थानिक पातळीवरील संपर्क, लोकांचे प्रश्न आणि संघटन यावर भर द्यावा, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला. एवढेच नाहीतर त्यांनी शिंदे गटाला महत्व न देता आपली लढत ही भाजपाशीच असल्याचे त्यांनी सांगितले.