समाजात उल्लेखनीय व यशस्वी काम करणा-या लोकांनी विनम्रता अंगीकारून समाजाचे नेतृत्व करावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Date:

पुणे, दि. 17 :  समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व यशस्वी काम करणा-या लोकांनी विनम्रता हा गुण अंगीकारून समाजाचे नेतृत्व करावे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

            लेक्सिकॉन ग्रुप, पुणे टाईम्स मिररच्या “भारत लिडरशिप अवार्ड 2021 ” चे वितरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लेक्सिकॉन कॅम्पस वाघोली, पुणे येथे  झाले. त्यावेळी श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी लेक्सिकॉन ग्रुपचे चेअरमन सुखदेव शर्मा, पुणे टाईम्स मिररचे अध्यक्ष पंकज शर्मा, पुणे टाईम्स मिररचे उपाध्यक्ष नीरज शर्मा, प्रा. अनिरुध्द देशपांडे, अवार्ड विजेते व त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.

            श्री. कोश्यारी म्हणाले, माणसाच्या स्वभावातील अहंकार हा त्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. माणूस जेवढा विनम्र राहील तेवढा यशस्वी होईल. काम करणा-यांपैकी जो आपल्या कामाचा मागोवा घेतो तोच यशस्वी नेता होऊ शकतो. आज समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणा-या व्यक्तींना माझ्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांनी सर्वांनी विनम्रता हा गुण अंगीकारला पाहिजे. विनम्रता हीच तुम्हाला सर्वोच्च उंचीवर घेऊन जाईल.

            सध्या कोरोनाची साथ चालू आहे. लोकांनी आपणहून नियम पाळलेच पाहिजेत अन्यथा नियम न पाळल्यास तिसरी लाट आपणच आणू असे सांगून श्री. कोश्यारी म्हणाले, पुणे टाईम्स मिररने समाजातील चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी समाजापूढे आणल्या पाहिजेत. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-यांचा भारत लिडरशीप अवार्ड देऊन सन्मान केला त्याबद्दल लेक्सिकॉन ग्रुपचे व अवार्ड विजेत्यांचे अभिनंदन.

लेक्सिकॉन ग्रुप, पुणे टाईम्स मिरर तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या पंचवीस मान्यवरांना भारत लिडरशीप अवार्ड 2021 देऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...

मानवतेसाठीचे अलौकिक बलिदान – गुरू तेग बहादुरजी

अमृतसरच्या गुरू महालात शिख धर्मीयांचे सहावे गुरू हरगोबिंदजी आणि...