पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी च्या ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’ निमित्त पुण्यात २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने सकाळी आठ वाजता शुभांगी मुळे आणि सहकाऱ्यांचा प्रार्थना आणि भजनाचा कार्यकम होणार आहे. याच दिवशी लोकमान्य टिळक पुतळा (महात्मा फुले मंडई) ते सेनापती बापट पुतळा (अलका टॉकीज चौक) ते या मार्गावर दंगलमुक्त पुण्याचा संदेश घेऊन सकाळी साडेआठ वाजता ‘शांती मार्च’ काढण्यात येणार आहे. पुणे शहर कायम दंगामुक्त राहावे, या संकल्पासाठी हा शांती मार्च काढण्यात येणार आहे. गांधी जयंती निमित्त स.१० ते दु. ३ दरम्यान सर्वांकरीता प्रसाद भोजन आयोजित करण्यात आले आहे. लहान मुलांसाठी जादूगार संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग दुपारी ४ वाजता होतील.
३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय लोकशाहीचे भवितव्य ‘ या विषयावर डॉ उल्हास बापट यांचे व्याख्यान होणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ह. भ . प. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘ पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे (चंद्रपूर) यांचे व्याख्यान होणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे (संपादक,लोकमत ,पुणे ) यांच्या उपस्थितीत सप्ताहाचा समारोप कार्यक्रम होणार आहे.
गांधी भवन आवारात खादी ,हातमाग आणि विविध गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्सचे प्रदर्शन २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’ निमित्त शांती मार्च
Date:

