मुंबई-नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून करावयाच्या कायमस्वरूपी नियुक्तीमध्ये ४०० कोटीचा घोटाळा झाला असल्याचे पत्र माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमत्र्यांकडे दिल्याचे समजत. हा अत्यंत भयंकर प्रकार आहे. एक ते दीड लाख रुपये प्रत्येक उमेदवाराकडून कडून घेण्यात आले. पाचशेच्या नोटा हवेत अश्या ऑडियो क्लिप सुद्धा पुरावादाखल त्याठिकाणी दिलेत. अत्यंत गंभीर स्वरूपाचा हा घोटाळा आहे. केंद्र सरकार यासाठी पैसे देत असते व याची अंमलबजावणी राज्य सरकार करत असते. वीस हजार नियुक्तत्यांच्या माध्यमातून असे पैसे घेतले असतील तर हे अतिशय गंभीर आहे आणि या घोटाळ्याची तात्काळ चौकशी करावी राज्य सरकारने करावी. यामध्ये बोलवता धनी कोण आहे व यामागचा सूत्रधार कोण आहे हे राज्यातील जनतेसमोर आणून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी आहे.
या घोटाळ्यामागचा बोलविता धनी कोण ?विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर
Date:

