पिंपरी -चिंचवड – छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांना देण्यात येणार्या जाहिरातींच्या दरात गेली दहा वर्षे वाढ झाली नाही,शिवाय जाहिरातींची संख्या आणि आकारही घटविण्यात आला आहे सरकारचे हे धोरण छोटया,जिल्हास्तरीय वृत्तपत्रांच्या मुळावर येणारे आहे,लोकांच्या प्रश्नाना थेट भिडणारी ही वृत्तपत्रे जगविणे हे सरकारची भूमिका असली पाहिजे त्यासाठी मराठी पत्रकार परिषद प्रसंगी रस्त्यावर येऊन लढा उभारेल असे मत मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले.
एस.एम.देशमुख यांची परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पिंपरी-चिंचवड पत्रकार संघातर्फे काल त्यांचा महापौर शकुंतला धराडे आणि मनपा आयुक्त राजीव जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी देशमुख बोलत होते.
ज्यांच्याकडे पत्रकारितेची पदवी आहे अशांनाच यापुढे वृत्तपत्र सुरू करता येणार आहे असे धोरण केंद्र सरकार अवलंबत आहे.त्याबद्दल देशमुख यांनी तीव्र नापंसती व्यक्त करीत हे धोरण म्हणजे देशातला संपूर्ण मिडिया मुठभर पुंजीपतींच्या हाती देण्याच्या दिशेने टाकलेलेल पाऊल आहे . .मिडियाची एकाधिकारशाहीकडे सुरू असलेली ही वाटचाल स्वतत्र मिडिया या संकल्पनेला मुठमाती देणारी असल्याने ते लोकशाहीवरील मोठे संकटही ठरणार आहे.शिवाय अशा निर्णयामुळे विचार ,लेखन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचीही गळचेपी होणार आहे.मराठी पत्रकार परिषद सरकारच्या या धोरणाचा तीव्रपणे विरोध कऱणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना महापौर शकुंतला धराडे यांनी पत्रकारांनी मला सभाधिट करण्याचे आणि बोलते करण्याचे काम केल्याचे सांगून पत्रकारांचे सहकार्य असल्यानेच आपण चांगले काम करू शकलो असे स्पष्ट केले
सायली कुलकर्णी नव्या अध्यक्षा
पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सायली कुलकर्णी यांची निवड काल कऱण्यात आली.मावळते अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ यांनी अध्यक्षपदाची सूत्रे त्याच्याकडे सुपूर्त केली.त्यांचाही महापौरांच्या हस्ते त्यंचा सत्कार करण्यात आला.यावेळी सायली कुलकर्णी यांनी सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब गोरे तसेच पुणे सचिव सुनील वाळुंज आणि शहरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.