पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपाच्या माई ढोरे, उपमहापौरपदी तुषार हिंगे

Date:

पिंपरी -पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर आणि उपमहापौरपदाची आज विशेष महासभेत निवडणूक पार पडली. यात भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका उषा उर्फ माई ढोरे या ८१ मतांनी निवडून आल्या तर उपमहापौरपदी भाजपाचे नगरसेवक तुषार हिंगे हे बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी राज्यात हालचाल सुरू असलेली महाविकास आघाडी ही महापौर निवडणुकीसाठी एकजूट असल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले.

राष्ट्रवादीच्या महापौरपदाच्या उमेदवार स्वाती उर्फ माई काटे यांचा भाजपाच्या उमेदवार नगरसेविका उषा उर्फ माई ढोरे यांनी ४० मतांनी पराभूत करत विजय मिळवला. माई काटे यांना ४१ तर माई ढोरे यांना ८१ मतं मिळाली. राष्ट्रवादीने देखील महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यामुळे निवडणुकीच्या अगोदर १५ मिनिटं माघार घेण्यासाठी देण्यात आली होती. यावेळी शिवसेनेच्या सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शवत माई काटे यांना मतदान केलं. तर मनसेचे एकमेव नगरसेवक सचिन चिखले हे गैरहजर राहिले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये महाविकास आघाडी पाहायला मिळाली.दरम्यान, महापौरपदाची निवडणूक झाल्यानंतर पीठासीन अधिकारी शंतनू गोयल यांनी उपमहापौरपदाची निवडणूक जाहीर केली. त्याअगोदर उमेदवारांना माघार घेण्यासाठी १५ मिनिटं देण्यात आली होती. काही मिनिटं झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू बनसोडे यांनी ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणत अचानक माघार घेतली. त्यामुळे भाजपाचे उपमहापौरपदाचे उमेदवार तुषार हिंगे हे बिनविरोध निवडून आले. भाजपाच्या विजयी महापौर आणि उपमहापौर यांचा पुष्पगुच्छ देऊन आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी शुभेच्छा दिल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...