‘पाटील’ चित्रपटाला लोकप्रतिनिधींची कौतुकाची थाप

Date:

समाजातील वास्तव मांडण्याचा  प्रयत्न करत कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था यातील खलप्रवृत्तीवर भाष्य करणाऱ्या पाटील चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. राज्यातल्या बहुतांश भागात चित्रपट प्रदर्शित झाला तर काही ठिकाणी होऊ शकला नाही. प्रेक्षक आग्रहास्तव पाटील येत्या २८ डिसेंबरला पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि., सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि. निर्मित पाटील संघर्ष… प्रेम आणि अस्तित्वाचाया चित्रपटात प्रेरणादायी संघर्षकथेची राजकीय पार्श्वभूमी दाखवतानाच कृष्णा आणि पुष्पा यांची हळुवार प्रेमकथा पहायला मिळणार आहे.

तत्पूर्वी राजकीय क्षेत्रातील नेतेमंडळींंसाठी या चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगचं आयोजनही केलं होतं. राज्याच्या विधीमंडळाचे प्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते या खास शोसाठी आवर्जून उपस्थित होते. यात आमदार श्री.डी.पी सावंत, श्री.बच्चू कडू, श्री.सतेज पाटील, श्री.प्रशांत ठाकूर, श्री.प्रसाद लाड, श्री.रामराव वाडकूते, श्री. संतोष टार्फे,  श्री. राजेंद्र नजरधाने, श्री. तानाजी मुटकुळे, श्री.हेमंत पाटील अशा विविध पक्षांच्या १०० हून अधिक आमदारांनी हा चित्रपट पाहिला. स्क्रीनिंगनंतर सर्वपक्षीय नेतेमंडळींनी कलाकारांच्या अभिनयकौशल्याची आणि चित्रपटाची प्रशंसा केली. चित्रपटाचं कथानकही उपस्थितांची दाद मिळवून गेलं. राजकीय नेत्यांना भावलेला पाटील प्रेक्षकांची मनं जिंकतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ग्रामीण भागातून आलेल्या आणि अतिशय खडतर परिस्थितीचा सामना केलेल्या संतोष राममीना मिजगर यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेल्या पाटील चित्रपटात एस.आर.एम एलियन, शिवाजी लोटन, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे,  यश आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीसाठी साहित्य संवर्धन आघाडीचे विशेष सॉफ्टवेअर विकसित

पुणे —महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक जाहीर झाली असून साहित्य...

10 ग्रॅम सोने 3 हजार रुपयांनी स्वस्त,पावणे दोन लाखावर पोहोचलेले सोने आज दीड लाखावर

नुकतेच काही दिवसा अगोदर पावणे दिन लाखावर पोहोचलेले...

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...