परीट (धोबी ) समाजाला पूर्ववत आरक्षणासाठी
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ” कपडे धुणे आंदोलन “
पुणे- महाराष्ट्रातील राज्यातील परीट (धोबी) समाजाला सन १९६० पूर्वी चालू असलेल्या अनुसूचित जातीच्या (एस.सी.) सवलती पुन्हा चालू कराव्यात या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ” कपडे धुणे आंदोलन ” करण्यात आले . पुणे परीट (धोबी) सेवा मंडळाचेवतीने पुणे शहर अध्यक्ष संजय पवार व आरक्षण कृती समितीचे कार्याध्यक्ष सुधीर लोणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले . राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कचेरीसमोर ” कपडे धुणे आंदोलन ” करण्यात आले .
या आंदोलनात पुणे शहर , जिल्हा , पिंपरी चिंचवड भागातील परीट सेवा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . या कपडे धुणे आंदोलनात पुणे परीट (धोबी) सेवा मंडळाचेवतीने पुणे शहर अध्यक्ष संजय पवार , पिंपरी चिंचवड अध्यक्ष रामदास जाधव , प्रदेश युवा संघटनेचे अध्यक्ष संतोष भालेकर यांनी प्रथम आपल्या अंगातील कपडे काढून रस्त्यावर धुणे धुवायला सुरुवात केली . त्यानंतर लॉंड्री संघटनेचे माजी अध्यक्ष दत्ता फंड , पिंपरी चिंचवड लॉंड्री संघटनेचे अध्यक्ष सुनिल पवार , कुमार शिंदे ,संतोष लोणकर , प्रकाश आरगडे , दीपक जगदाळे , बाळासाहेब नांगरे , संजय बोरसे , अनिल मोटांगे , रामेश्वर सोनटक्के , हरिभाऊ काळे , ऍड. संतोष शिंदे , तानाजी लोणकर , अजय जगदाळे , विकास शेलवटे , अनुप राऊत , अमित जाधव , धनाजी चन्ने , सुधाकर यादव , माणिक कडे , रतिलाल जाधव , गंगाराम राऊत , सोमनाथ अभंग , वैशाली राऊत , शुभांगी काळे , छायाताई ठाणेकर , सुनिता दळवी , महादेव राऊत , राजन लोणकर , अरुण लोणकर , विशाल जाधव , रामभाऊ राऊत , नंदकुमार कदम , अशोक भागवत , उषा पवार , रत्नाकर दळवी , तुकाराम केदारी , अनिल दळवी , मोहन साळुंके , सुहास पवार , योगेश वाघमारे , प्रविण जाधव , शाम जगताप , राहुल राक्षे , प्रभाकर सोनटक्के , सागर रोकडे , विकास शेलवटे , चंद्रकांत कदम , अजय ननावरे , राजू लोणकर , श्रीरंग मोरे , सुनील गायकवाड , राजाभाऊ कदम , आदित्य शेलार , कृष्णा खंडागळे , हरी शेवाळे , राजाभाऊ राऊत , प्रकाश अभ्यंकर , गणेश अभंग आदी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
यावेळी पुणे परीट (धोबी) सेवा मंडळाचेवतीने पुणे शहर अध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले कि , महाराष्ट्र राज्यात परीट (धोबी) समाजातील बांधवाना १९६० पर्यंत अनुसूचित जातीचे (एस.सी.) आरक्षण असतांना शासनाने क्षेत्रबंधन कायद्याने परीट (धोबी)समाजाला एस.सी.कॅटेगिरीमधून वगळून ओबीसी मध्ये समाविष्ट केले.त्यानंतर शासनाने नेमलेल्या डॉ.दशरथ भांडे अभ्यास समितीने परीट (धोबी) जातीला पूर्ववत अनुसूचित जातीच्या सवलती देण्याची स्पष्ट शिफारस केलेली असतांना शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.परीट (धोबी) समाजातील बांधवांच्या या प्रलंबित प्रश्न लक्ष वेधण्यासाठी व समाजाला तातडीने न्याय मिळावा म्हणून परीट (धोबी) समाज बांधवानी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर ” कपडे धुणे आंदोलन ” केले .
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विशाल जाधव याना शिष्ठमंडळाने निवेदन दिले .