पंचशील सोशल फाऊडेशन , पंचशील पुरस्कार संघ व मछीन्द्र (दादा ) एकनाथ गायकवाड प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंतीनिमित्त ” पंचशील चषक २०१६ ” या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक प्रदीप गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले .
पुणे रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे मैदानावर झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास स्वीकृत नगरसेवक राजाभाऊ जोगदंड , गणेश गायकवाड , विनोद उबाळे , यासीन शेख , महेंद्र कांबळे , प्रमोद कांबळे , कुंदन रणधीर , निलेश साबळे , रमेश तलवार , गुलाब कांबळे , सोहन परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते .
या स्पर्धेमध्ये ३२ संघांनी सहभाग घेतला आहे . या स्पर्धेचा अंतिम सामना रविवार २० मार्च रोजी होणार आहे . यावेळी विजेत्या संघास पंचशील चषक २०१६ महापौर प्रशांत जगताप यांच्याहस्ते करण्यात येणार आहे . अशी माहिती स्पर्धेचे सयोजंक नगरसेवक प्रदीप गायकवाड यांनी दिली .