Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

खा .सुप्रिया सुळे रमल्या पालखी सोहळ्यात ..

Date:

माऊलींचा पालखी सोहळा सासवडनगरीत विसावला : संत तुकाराम महाराजांचा लोणी काळभोरला मुक्काम

पुणे-काल अजित पवारांनी पालख्यांचे दर्शन घेवून आज ते नागपूमध्ये  अधिवेशनात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबा माऊलींचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेचा समाचार घेतला तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी पालखीच्या वाटेवर दिवे घाटात वारकऱ्यांसमवेत ज्ञानबा माऊली तुकारामाचा जयघोष केला ,तर कधी होऊन टाळ गजर केला.दरम्यान आज  माऊलींचा पालखीसोहळा सासवडनगरीत विसावला तर संत तुकाराम महाराजांची पालखी  लोणी काळभोरला मुक्कामी पोहोचली

लाडक्या विठूरायाच्या चरणी लीन होण्याकरिता कपाळी केशरी गंध लावून, खांद्यावर भगव्या पताका घेऊन, डोईवर तुळशीवृंदावन घेत मुखाने अखंड ज्ञानोबा-माऊली तुकारामांचा गजर करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज सकाळी पुण्यातून मार्गस्थ झाल्या आणि दुपारी हडपसरमध्ये दाखल झाल्या. त्यानंतर ज्ञानोबा-माऊलींच्या अखंड नामघोषाने पायात संचारलेल्या बळाच्या जोरावर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने सोमवारी नागमोडी वळणाचा चार किलोमीटरचा अवघड दिवे घाट लीलया पार केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवेघाटात वारकऱ्यांच्या मेळ्यात सहभाग घेतला. त्या म्हणाल्या, “विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूराकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या मेळ्यात दिवेघाटात मी सहभागी झाले. शतकांपासून वारकरी या मार्गावरुन पंढरीकडे मार्गस्थ होतात.राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी,टाळ मृदुंगाच्या घोषात विठूरायाच्या नामस्मरणात तल्लीन होतात तेंव्हा अवघा रंग एक झाला हा अनुभव येतो”


चांगल्या पावसाने घाटात रंगलेल्या हिरवाईच्या दर्शनाने जलधारा अंगावर घेताना वारकऱ्यांचा थकवा पळून गेला. पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर सोमवारी रात्री पालखी सोहळा संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत दाखल झाला.
पुण्यनगरीत अवघा आनंद’ म्हणत शनिवार आणि रविवारचा दिवस वारकऱ्यांनी विश्रांती घेतली. परंतु, सोमवारी पालखी सोहळ्यातील सर्वात मोठा टप्पा होता. पण सोपानकाकांच्या सासवडनगरीच्या दर्शनाची ओढही होती. त्यामुळे सकाळी साडेसहा वाजताच पालखीने सासरवडच्या दिशेने प्रस्थान केले. लाखो वैष्णवजनांसह सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखी दिवे घाटात पोहोचली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही चढण पार करून पालखीने पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. घाटावर उपस्थित हजारो माऊली भक्तांनी हा नयनरम्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. या वेळी घाटाच्या शेवटच्या टप्प्यात माऊलींच्या पालखीरथावर पुरंदरकरांच्या वतीने पुष्पवृष्टी आणि विठू नामाच्या गजरात माऊलींचे स्वागत करण्यात आले.
तत्पूर्वी पुण्यातील भक्तीसंगमानंतर संतश्रेष्ठ तुकोबाराय व ज्ञानोबा माऊलींची पालखी सोहळा सकाळी पुण्यनगरीतून पंढरपूरच्या दिशेने निघाला. तुकोबारायांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोर येथे मुक्कामी पोहचली तर ज्ञानोबा माऊलींची पालखी दिवे घाटातून संत सोपानकाकांच्या नगरीत मुक्कामाला विसावली.
पुरंदरच्या भूमीत संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा दुपारी पाच वाजता दाखल झाला. पुरंदर तालुक्यातील हजारो भाविक आज माऊलींच्या दर्शनासाठी व स्वागतासाठी ठिकठिकाणी थांबले होते. प्रत्यक्ष घाटाची चढण सुरू झाल्यावर स्थानिक ग्रामस्थांच्या पाच बैलजोड्या जोडण्यात आल्या होत्या. दुपारी ५ वाजता दिवे घाट चढून आल्यावर झेंडेवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी अनेक मान्यवरांनी सोहळ्याचे स्वागत केले. झेंडेवाडीनंतर काळेवाडी, ढुमेवाडी, दिवे, पवारवाडी या ठिकाणी गावकऱ्यांनी स्वागत केले व दर्शनाचा लाभ घेतला.
माऊलींच्या रथाला मानाच्या बैलजोडीबरोबर स्थानिक शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांनीही रथ ओढण्यास मदत केली. घाटावरील भाविकांनी हा नयनरम्य सोहळा आपल्या डोळ्यांत साठवला. माऊलीनामाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते.
झेंडेवाडी येथील विसाव्याच्या ठिकाणी काही वेळ हा सोहळा विश्रांतीसाठी थांबला. यावेळी हजारो वारकऱ्यांनी घाटमाथ्यावर काही वेळ विश्रांती घेतली.
पुढील मार्गावर विविध व्यक्ती, सामाजिक संस्थांच्या वतीने रस्त्यात ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी पाणी, चहा, फराळाचे साहित्य वाटले जात होते. तरुण, विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने वाहतूक व्यवस्था पाहत होते. अनेक ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेसाठी औषधांची, पाणीपुरवठ्याची सोय केलेली आहे.
सासवड नगरपालिकेच्या वतीने चंदन टेकडी येथे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, अजित जगताप, मुख्याधिकारी विनोद जळक, सुहास बापू लांडगे, इतर नगरसेवक तसेच पालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. पालखीने सासवड शहरात प्रवेश केल्यावर सोपाननगर कमानीजवळ पुरंदर तालुका कॉँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष संजय जगताप, तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, अनिल उरवणे, चंद्रशेखर जगताप, विश्वजित आनंदे आदी उपस्थित होते. दिवे घाटापासून सासवडमध्ये प्रवेश करताना रिमझिम पावसाने हजेरी लावली.
सासवड येथील पालखीतळावर विजेचे दिवे, तंबूजवळ फ्लड लाईट, जनरेटर, भाविकांना दर्शनासाठी दर्शनबारी असून त्यासाठी स्वयंसेविका नेमल्या आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...