साने गुरुजी स्मारक पालगड ला सर्वतोपरी मदत करणार :महादेव जानकर
पुणे :
पशुसंवर्धन -दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी बुधवारी सायंकाळी साने गुरुजी स्मारक (पालगड )ला भेट देऊन साने गुरुजींना अभिवादन केले . साने गुरुजी यांच्या मातोश्री यशोदा साने यांच्या स्मृती शताब्दीच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी पालगड स्मारकाला भेट देऊन पाहणी केली . साने गुरुजी यांच्या राहत्या घराचे स्मारकात रूपांतर करण्यात आले आहे . तेथे साने गुरुजी यांच्या जीवनाचा पट प्रदर्शन स्वरूपात मांडण्यात आला आहे .
‘साने गुरुजी यांचे जीवन आणि कार्य मानवतेसाठी आदर्श आहे . मी या स्मारकाला भेट देऊन भारावून गेलो आहे . उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या या गावाला सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगून त्यांनी गावातील रस्त्यांची कामे तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि प्रांत यांना दिले . आणि इतर समस्यांच्या संदर्भात मुंबईत विशेष उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले .
यावेळी मंगेश गोंधळेकर ,विद्याधर जोशी ,दत्ता जोशी ,शरदचंद्र खरे ,सुनील पवार ,रत्नाकर गुरव अरविंद जोशी ,युवराज जाधव इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते