संजय लीला भन्सालींच्या पद्मावती चित्रपटाचा फस्ट लूक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पाहायला मिळालाय. वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि भन्साली प्रोडक्शन्सच्या पद्मावती सिनेमाचे पहिले पोस्टर 21 सप्टेंबरला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रिविल झालंय.
संपूर्ण देशभरात एकिकडे नवरात्रीची घटस्थापना होत असतानाच भन्सालींच्या राणी पद्मावतीचे रूप सर्वांसमोर आलंय. पद्मावती फिल्म भारतीय संस्कृती आणि भारतीयांच्या कर्तृत्वाचं प्रतिक आहे. त्यामूळे नवरात्रीला देवीच्या स्थापनेच्या शुभ प्रसंगी ह्या चित्रपटाचा फस्ट लूक अनविल झाला आहे.
पद्मावती चित्रपटात आजपर्यंत कधीही न अनुभवलेली दृश्यात्मक अभिव्यक्ती पाहायला मिळणार आहे. सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आणि भव्य सिनेमॅटिक अनुभव हे पद्मावती चित्रपटाचे वैशिष्ठ्य असेल.
संजय लीला भन्साली ह्याविषयी सांगतात, “राणी पद्मावतीची कथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी उत्सुक आहे. नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आमच्या चित्रपटाचा फस्ट लूक घेऊन आम्ही आलोय. आणि नवरात्रौत्सव साजरा करतोय.”