मुंबई – माझ्याकडे एकूण ४० आमदार आहेत बहुमत माझ्याकडे आहे म्हणजेच आमचीच शिवसेना ओरीजानल आहे , आणि या शिवसेनेचे प्रतोद गोगावले यांचा व्हीप ज्या शिवसेनेच्या आमदारांनी पाळलेला नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल असे आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले . कायदा , नियम या नुसार सर्व होईल असे ते म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी त्यांच्या समवेत होते .