राज ठाकरेंच्या सभेला आमचा विरोध कायम; मुसलमानांना मुद्दाम टार्गेट केले जातेय

Date:

मुंबई-

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील सभेला आमचा विरोध आहे. औरंगाबाद हे संवेदनशील शहर आहे. शिवसेना असेल किंवा काँग्रेस सोबत आम्ही जायला तयार आहोत. आता त्यांनी ठरवायचे आहे काय करायचे ते. मागे उद्धव ठाकरे यांच्या सोबत मातोश्रीवर भेट झाली पण युतीची चर्चा झाली नाही. आम्ही कोणाची बी,सी टीम नाही. आम्ही आमचे मालक आहोत. आम्हाला जर भाजप सोबत जायचे असेल तर कोणी अडवू शकत नाही. आम्हीच स्वतःला अडवले आहे. असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्दांवर भाष्य केले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसींना फसवण्याचे कारस्थान सुरू केले आहे. जुना मागासवर्गीय आयोग संपवून नवीन सुरू केला, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने पुन्हा ओबीसींना फसवण्याचे कारस्थान सुरु केले आहे. मी मुद्दाम कारस्थान हा शब्द वापरतोय. जुना मागास आयोग संपवुन नवीन मागासवर्ग तयार करत आहेत. मागचा अहवाल जो सुप्रीम कोर्टात दाखल केला तो कोर्टाने कचऱ्याच्या टोपलीत टाकला. जो अहवाल 18 मुद्यावर पाहिजे होता. अशी टीका आंबेडकरांनी केली आहे.

ओबीसी अहवाल फसवा

ग्रामपंचायतमध्ये ओबीसी जागा किती, त्या भरल्या की नाही. त्यातील किती क्रिमिलीअर मधून भरल्या आहेत. बिहारमधील पिछडा आणि अती पिछडा वर्गवारी केली आहे. त्याला सुप्रीम कोर्टाने थांबवले नाही. लोकसंख्येच्या आधारावर जे बॅकवर्ड ठरविण्यात आले आहेत. नव्या आयोगाच्या नोटीफिकेशन आलेला आहे त्यात या मुद्यांचा उल्लेख नाही. तो फसवा आहे. कोर्ट निर्णय देत नाही असा प्रचार चार पायाचे पक्ष करतील. त्यात भाजप ही आहे. याचा आम्ही निषेध करतो. जो पर्यंत ही तयारी होत नाही तोपर्यंत कोर्ट ही स्थगिती उठवेल असे वाटत नाही. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हनुमान चालिसाने टार्गेट करण्याचा प्रयत्न

हनुमान चालिसाच्या माध्यमातून मुसलमानांना टार्गेट केले जात आहे. कर्नाटकच्या मुस्कानचा सत्कार आम्ही औरंगाबादमध्ये घेण्याचे ठरवले होते. पण आम्हाला परवानगी मिळाली नाही. असे आंबेडकर म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोहगाव पाणीप्रश्नावर ठोस पावले; आमदार बापूसाहेब पठारे यांची बैठक व पाहणी

पुणे: लोहगाव परिसरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार बापूसाहेब पठारे यांनी...

पाषाण तलाव प्रदूषित: महापालिका आयुक्तांची धडक: चार अधिकारी सस्पेंड

पुणे दि. १०.०४.२०२६ : मैलापाणी थेट पाषाण तलावात मिसळून...

आयुक्तसाहेब,’त्या सर्व’ पत्रकारांवर कारवाई कराच..

एकीकडे पोलिसांनीच खोटा पोक्सो दाखल करण्याची धमकी देऊन...