मी राष्ट्रवादीतच; भाजप आणि राष्ट्रवादी मिळून स्थिर सरकार देऊ : अजित पवार

Date:

मुंबई : बंडखोरी करत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच भूमिका जाहीर केली आहे. ‘मी राष्ट्रवादीतच असून आदरणीय शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी मिळवून जनतेच्या कल्याणासाठी पुढील पाच वर्ष स्थिर सरकार देऊ’, असं ट्वीट अजित पवार यांनी केलं आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीच्याच मदतीने पुढचं सरकार बहुमत सिद्ध करणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.अजित पवारांनी पहिल्यांदाच मौन सोडत एकापाठोपाठ एक १६ ट्वीट केले. यात पहिलं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी होतं. पंतप्रधान मोदींचे आभार मानत राज्यात जनतेच्या कल्याणासाठी स्थिर सरकार देऊ, अशी ग्वाही अजित पवार यांनी मोदींना दिली. याशिवाय त्यांनी भाजपच्या इतर नेत्यांसह गृहमंत्री अमित शाह यांचेही आभार मानले.‘काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. सर्व काही आलबेल आहे. फक्त थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यासाठी आभार’, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांना राष्ट्रवादीचे विधीमंडळाचे गटनेते म्हणून निवडण्यात आलं होतं. याच अधिकाराचा फायदा घेऊन अजित पवार यांनी आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना दिलं आणि तातडीने शपथविधीही आटोपला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लैंगिक छळाच्या प्रकरणात शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या अटकेला स्थगिती

अलाहाबाद उच्च न्यायालयाने लैंगिक छळाच्या प्रकरणात शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद...

लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग

अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न; परिसरात धुराचे मोठे लोट, नागरिकांच्या...

मराठीला ज्ञान भाषेत रूपांतरित करून पुढील पिढीपर्यंत नेऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात ‘ जावे विनोदाच्या गावा‘ विशेष कार्यक्रम मुंबई, दि....