ओतुर -(संजोक काळदंते)
वर्गणी गोळा करण्यासाठी जाणाऱ्या संयोजकांवर आता पोलिसांची नजर असून बळजबरीने वर्गणी गोळा करताना तक्रार आल्यास खंडणीचा गुण्हा नोंदविला जानार असल्याचे ओतुरचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रविंद्र थोरात यांनी सांगितले.
काही दिवसांवर शिवजयंती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्याने ओतुर पोलीसांच्यावतीने परिसरातील गावांमधील संयोजकांची समन्वय बैठक घेण्यात आली यावेळी ओतुरचे ग्रामपंचायत सदस्य आशिष शहा,रामदास तांबे,उदापूरचे बाळासाहेब ढमडेरे,सागर मंडलीक,खामुंडी,डिंगोरे,पारगाव ,सितेवाडीचे संयोजक ग्रामस्थ,पत्रकार उपस्थित होते.यावेळी वेगवेगळ्या उत्सवात कायद्याचा भंग न होता उत्साहात उत्सव तसेच यात्रा व ईतर कार्यक्रम करावेत अशा सुचना देण्यात आल्या.पोलिसांचे सहकार्य घेऊन अनुचित प्रकार टाळावेत.यासाठी पोलिस आणि नागरिक समन्वय महत्वाचा आहे असे सहाय्यक पोलिस निरिक्षक रविंद्र थोरात म्हणाले तर जमलेल्या माण्यवरांनीही आपल्या अडीअडचणी मांडल्या.उत्सव संपन्न होण्यासाठी सर्वांनी कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे सर्वप्रकारच्या खबरदारी उत्सव समितीने घेतल्यास कोणताही अनुचित प्रकार होणार नाही असे ते म्हणाले.डी.जे.बंदी असल्याने डी.जे.लावण्याचा आग्रह टाळावा पुरातन पारंपारिक वाद्य ढोल लेझीम पथक लावुन सर्वप्रकारच्या मिरवणूका काढाव्यात अशा सुचना पोलिसांतर्फे देण्यात आल्या आहेत.देणगी पावती तथा दान पावती ऐच्छिक असावी कोणावरही याबाबत दबाव आणू नये असेही यावेळी बोलताना रविंद्र थोरात यांनी सांगितले.