दहा लाखाचे बारा लाख घ्या — ठकसेन ‘बंटी बबली ‘पोलिसांच्या जाळ्यात ..
ओतुर(संजोक काळदंते)-
निवडणुकीसाठी सुटे हवेत ,दहा लाख द्या …तुम्हाला बारा लाखाच्या -दोनशेच्या नोटा देतो….. असे आमिष दाखवुन त्यामध्ये बोगस नोटा देणा-या एका टोळीच्या महिला मोहरक्याला आणी तीच्या एकुण अकरा साथीदाराना आळेफाटा पोलीसांनी बुधवारी(दि.२४)सांयकाळी जेरबंद केले.या घटनेमुळे बोगस नोटा छापुन सर्वसामान्य नागरीकांना “ठकवणा-या”चे …रॅकेट आळेफाटा पोलीसांच्या हाती लागणार..? आळेफाटा पोलीसांनी केलेल्या कामगीरीमुळे सर्वसामान्य नागरीकांमधुन कौतुक केले जात आहे.
याबाबत आधिक समजलेली माहिती अशी की….पाबळ येथील एक व्यक्तीला..निवडणुकीसाठी सुट्टे पैसे लागणार अशी कुणकुण या टोळीची म्होरक्या असणारी महिला आणी तीचा साथीदार याला लागली.त्यांनी ज्याला पैशाची निकड आहे त्याला फोन करून दहा लाख घेऊन या…तुम्हाला दहा लाख आणी त्या बदल्यात दोन लाखाच्या सर्व दोनशे रूपयांच्या नोटा उपलब्ध करून देतो असे सांगीतले .आणी झाले तसेच त्यांनी स्थानिक बॅंकेतुन दहा लाखाच्या नोटा या महिलेच्या सुपुर्द केल्या व त्याबदल्यात सर्व २००/- रूपयांच्या नोटा असणारे १२ लाखाचे बंडल बॅग मधे भरून दिल्या…
मात्र थोडा कालावधी गेल्यावर त्याची फसवणुक झाल्याची लक्षात आले..कारण बॅग मधे २०० च्या बंडल मधे सर्व दोनशेच्या नोटा खोट्या आढळुन आल्या.तर त्या बंडलच्या खाली फक्त कोरेच कागद आढळुन आले. असता याबाबत त्यांनी आळेफाटा पोलीसांना माहिती दिली.
तात्काळ आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक जी.आर उगले आणी महिला सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीमती ज्योती डमाले यांनी आपल्या कर्मचा-यासोबत संपुर्ण माहितीचा तपास करून पुणे येथुन “बंट्या बबलीला “ताब्यात घेतले आहे.
यामधे वि.का.सोसायटीमधे लाखो रूपयांना चंदन लावणा-या एक सचिव व तसेच एका शासकीय बॅंकेत मॅनेजर या पदावर काम करणा-यांचा समावेश आहे.
सांयकाळी साडे सात पर्यंत त्यांची कसुन तपासणी आणी गुन्हा नोंद करण्याची प्रोसेस चालु होती.हे मात्र खरे…!