ओतूरला विजेचा धक्का बसुन तिसरीच्या विद्यार्थीनीचा मृत्यु जिल्हा परिषद शाळेतील घटना
ओतूर (संजोक काळदंते)-
ओतूर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा नंबर दोन मधील इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या कु.सिध्दी बाळासाहेब सोमवंशी (वय-९ वर्षे,रा.तांबेमळा,ओतुर,ता.जुन् नर,जि.पुणे) ही बुधवार (दि.२४)दुपारी ३:१५ वाजता या शाळेेेमध्ये असलेल्या पाणी शुध्दीकरण मशीनचे पाणी पिण्यासाठी मशीन जवळ गेली असता या विद्यार्थिनीला शुध्द पाणी पुरवठा करणाऱ्या मशीनचा विजेचा धक्का बसुन दुर्दैवी मृत्यू झाला.असल्याची माहीती ठाणेअंमलदार कैलास काळे यांनी दिली.
दुपारच्या सुट्टीत जेवण झाल्यानंतर पाण्याची बाटली भरून आणण्यासाठी मशीन जवळ सिध्दी ही गेली असता विजेचा धक्का बसुन ही दुर्दैवी घटना घडली.याबाबत मुलीचे मामा भुषण चंद्रकांत तांबे (रा.ओतुर,ता.जुन्नर)यांनी पोलिस ठाण्यात खबर दिली असुन अधिक तपास सहाय्यक फौजदार के.व्ही.पाटोळे करीत आहेत.
सदर घटनास्थळी जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधीर भागवत,गटशिक्षण अधिकारी पांडुरंग मेमाणे,केंद्रप्रमुख यश मस्करे यांनी भेट देऊन चौकशी केली.