Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शिक्षण महर्षी स्वर्गीय विलास तांबे कृतज्ञता गौरव पुरस्कार २०१६ व गुरुजनाचा सत्कार सोहळा संपन्न

Date:

मोफत नेत्र तपासणी शिबिरात ४०० रुग्णांची तपासणी

ओतूर-दि.३(संजोक काळदंते)
शिक्षण महर्षि स्वर्गीय विलास तांबे फौंडेशन पुणे-ओतूर व श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ओतूर (ता जुन्नर) व सर्व शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षि स्वर्गीय विलास तांबे सर यांचे ६९ व्या जयंती निमित्त डुंबरवाडी (ओतूर ता जुन्नर) येथे कृतज्ञता गौरव पुरस्कार २०१६ चे वितरण व संस्थेच्या गुरुजन विद्यार्थी यांचा गौरव सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या ६९ व्या जयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले होते, या शिबिरात एकूणनेत्र रुग्नांची तपासणी  ४०० करण्यात आली.
या संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीहरी तांबे होते.     ज्यांच्या हस्ते कृतज्ञता गौरव पुरस्कार व शिक्षक विद्यार्थी यांचा गौरव करण्यात आला त्यासाठी शिव व्याखाते गुलाबराव वळसे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, या कार्यक्रमासाठी संस्थेचे मानद सचिव वैभव तांबे, राहुल काकडे, सरपंच धनंजय डुंबरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष तांबे,संचालिका निलम तांबे, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार संभाजी तांबे, माजी प्राचार्य मंगल तांबे,सचिन तांबे, सोपान तांबे, भिमाजी औटी, बाळासाहेब डुंबरे, गुलाब डुंबरे, गणेश तांबे,आशिष शहा, प्रा डॉ गणेश दामा , प्रा डॉ जी यु खरात, प्राचार्य कोरे,ग्रामपंचायत सदस्या स्मिता डुंबरे, पराग जगताप, संजोग काळदंते, अनंथ बोरकर, गांधी पानसरे, मुख्याध्यापक बशीर शेख, संतोष झावरे, प्रा कदम,नाथा शेठ तांबे, ओतूर डुंबरवाडी ग्रामस्थ, भुजबळ सर,गाडेकर सर, प्राचार्य बोबडे, सूर्यवंशी, बाबा साहेब जाधव, अश्विनी गीते, माणिक बोऱ्हाडे , प्रदीप थोरात, विविध शाखांचे मुख्याध्यापक , शिक्षक , फार्मसी , इंजिनीअरिंग , पोलीटेकनिक , एम बी ए चे सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्री गजानन महाराज व शिक्षण महर्षि श्री विलासराव तांबे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
सावित्रीबाई फुले विद्यालय व सीताबाई तांबे कनिष्ठ महाविद्यालय ओतूर, वीर सावरकर विद्यालय पांगरी माथा , शारदाबाई पवार विद्यालय आंबेगव्हांन , विलास तांबे विद्यालय मुथाळने  या माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे अध्यापन विषयांचे १००% निकाल लागले त्यांचा प्रमाणपत्र पुष्पगुच्छ  देऊन सत्कार करण्यात आला.
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेपासून विविध प्रकारचे मार्गदर्शन केले, वृत्तपत्रातून संस्थेच्या विविध उपक्रमांना सातत्याने प्रसिद्धी देऊन संस्थेचा नाव लौकिक वाढविला त्या बद्दल ओतूर चे जेष्ठ पत्रकार रामनाथ मेहेर सर यांचा शिव व्याख्याते गुलाबराव वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मान पत्र , स्मृती चिन्ह, शाल श्रीफळ, बुके व ११हजार रुपये देऊन त्यांचा गुण गौरव करून त्यांना कृतज्ञता पुरस्कार बहाल करण्यात आला.
रामनाथ मेहेर सर यांनी पुरस्काराला उत्तर दिले, तेंव्हा त्यांनी स्वर्गीय विलास तांबे यांनी कोणत्या परिस्थितीत शाळा, महाविद्यालये,विना अनुदान तत्वावर सुरु करून गोर गरीब आदिवासी मुले, मुली यांच्या साठी शिक्षणाची गंगा ओतूर मद्धे कशी आणली हे सांगितले.
या निमित्त सचिव वैभव तांबे,अध्यक्ष श्रीहरी तांबे,सरपंच धनंजय डुंबरे यांनी मनोगते व्यक्त केली.             प्रमुख पाहुणे शिव व्याख्याते गुलाबराव वळसे पाटील यांनी आपल्या व्याख्यानात शिक्षण महर्षि विलास तांबे यांनी नेपोलियन चा आदर्श ठेवून ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी , आदिवासींसाठी ,महिलांच्या शिक्षणासाठी जे कार्य केले त्याला तोड नाही, त्यांची पत्नी निलम ताई तांबे, कर्तबगार मुले पुणे म न पा चे नगर सेवक व अध्यक्ष विशाल तांबे, सचिव वैभव तांबे यांनी समर्थ पणे संस्थेचा विकास करीत आहेत , विलास तांबे यांनी दुसर्यांची घरकुले उभी केली, माणसे जोडण्याचे काम केले, समाजासाठी जो जगतो तोच खरा माणूस असतो, विलास तांबे हे शिक्षण पंढरीचे वारकरी होते असे सांगून विविध आठवणी सांगितल्या , कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांचा शैक्षणिक वारसा चालवणारे महान शिक्षण तज्ञ व कर्मयोगी होते असे सांगितले.
मानद सचिव वैभव शेठ तांबे यांनी प्रास्तविक केले, प्रास्ताविकात त्यांनी स्वर्गीय विलास तांबे सर यांनी कोणत्या परिस्थितीत शिक्षण संस्था उभारली शिक्षणासाठी काय केले, वृत्तपत्र वाटले, पोस्टमन , मुकादम , भाजीपाला, केळी, व्यवसाय करता करता रात्रशाळेत शिक्षण पूर्ण करून सी पी एड होऊन शिक्षक झाले, त्या व्यावसायातूनच त्यांना प्रेरणा मिळाल्याचे संगीतलले व सर्व उपस्थितांचे स्वागत केले.
पोपट घनवट यांनी सूत्र संचालन केले, सखाराम वाकचौरे यांनी आभार मानले.
मोफत नेत्र शिबिराचे उदघाटन शिव व्याख्याते गुलाबराव वळसे पाटील व कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच डॉ मनोहर डोळे मेडिकल फाऊंडेशन मोबाईल आय क्लिनिक अत्याधुनिक फिरत्या व्हॅनचे उदघाटन करण्यात आले.   या शिबिरात एकूण ४०० रुग्नांची तपासणी करण्यात आली, या शिबिरात एकूण ५१ मोतिबिंदूचे रुग्ण आढळले त्यांना नारायणगाव येथे शस्त्र क्रियेसाठी पाठविण्यात आले.या नेत्र शिबिराचे नियोजन भास्कर पो डुंबरे व गुलाब अण्णा डुंबरे यांनी केले होते.
या शिबिरात डॉ योगिता कऱ्हाड यांनी तपासणी केली, रवींद्र कानडे, नामदेव पवार, उल्का घाडगे यांनी त्यांना सहकार्य केले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...