तब्बल ३७ वर्षांनी वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांची घेतली हजेरी ….
ओतुर – दि.८ (संजोक काळदंते)
ओतूर (ता.जुन्नर) येथील श्री गाडगे महाराज मिशन मुंबई संचलित श्री गाडगे महाराज विद्यालयाचे सन १९८१ इयत्ता १० वी ब चे माजी विद्यार्थी व त्यांना शिकविणारे शिक्षक यांचा स्नेहमेळावा अहिनवेवाडी रोड वरील माजी विद्यार्थी रमेश डुंबरे यांनी कर्नाटक शैलीत बांधकाम केलेल्या अलिशान बंगल्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
१९८१ साली ,इयत्ता १० ब च्या वर्गात एकण ५६ विद्यार्थी होते त्यापैकी ५२ विद्यार्थी उपस्थित होते.
त्यांचे वर्गशिक्षक रामनाथ मेहेर हेही उपस्थित होते अध्यापन करणारे शिक्षक विठ्ठल कातोरे,अशोक सहाणे,ज्ञानदेव सातपुते ,विठ्ठल भागवत,सोपान घोलप, शिवाजी देशमुख, सौ कुसुम हुलावळे, रा. ना. मेहेर उपस्थित होते.
इलेक्ट्रीक बेल झाली सर्व माजी विद्यार्थी वर्ग हॉल मध्ये येऊन बसले .वर्गशिक्षक व सर्व शिक्षक हॉल मध्ये आले सर्वांनी शिक्षकांना अभिवादन करून शाळेची नियमित प्रार्थना म्हटली
वर्गशिक्षक रा.ना.मेहेर यांनी हजेरी घेतली. गैरहजर विद्यार्थ्यांची व शिक्षकांची चौकशी केली
काही विद्यार्थी व शिक्षक यांना अकाली मृत्यू झाला त्या सर्वांना श्रध्दांजली वाहण्यात आली .
उपस्थित विद्यार्थी इंजिनिअर,डॉक्टर,पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, शिक्षक कोणी शिक्षण संस्था काढल्या ,पतसंस्था काढल्या कोणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कोणी प्रगत व प्रयोगशील शेतकरी, बांधकाम व्यावसायिक आदी ठिकाणी कार्यरत आहेत हे सांगून कुटुंबाचा परिचय करून दिला.काहींची मुले तर काहींची नातवंड देखील उच्चशिक्षीत आणि उच्चपदस्त आहेत हे ऐकुण शिक्षकांनी अभिमान व्यक्त केला.
शिक्षकांनी ही सेवानिवृत्त नंतरचे जीवनातील वाटचाल या बद्दल माहिती दिली .
या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित शिक्षकांना शाल श्रीफळ बुके व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले .
सर्व माजी विद्यार्थ्यांना शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन शिक्षकांच्या हस्ते गौरविण्यात आले
विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षकांनी जे संस्कार केले मार्गदर्शन केले शिस्तीत वाढविले काही वेळा धपाटे खाल्ले या मुळेच आमचे जीवन घडले तेव्हा गरीबी होती आज सुख समाधान आहे म्हणून हा कृतज्ञता सोहळा अशी मनोगते व्यक्त केली .
या निमित्ताने माजी विद्यार्थी सहाय्यनिधी स्थापन करीत असल्याचे रमेश डुंबरे यांनी जाहीर केले.
सेवा निवृत्त शिक्षक मेहेर,देशमुख,भागवत,सहाणे सातपुते,घोलप,कातोरे यांनी मनोगते व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या स्नेहमेळाव्याचे रमेश डुंबरे,शशिकांत हळदे,हेमंत डुंबरे,सुरेश बनकर, माणिक डुंबरे,राजेंद्र अवचट,डॉ.विजया हांडे,प्रभाकर डुंबरे,संपत अहिनवे,शिवाजी डुंबरे आदी सर्व वर्गमित्रांनी नियोजन केले होते.
वंदेमातरम ने व पसायदानाने स्नेहमेळाव्याची सांगता झाली.