ओतुर (संजोक काळदंते)-
ग्राम विकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वी मधील विद्यार्थ्यांच्या पालक व शिक्षक मेळाव्याचे आयोजन दोन सत्रांत केल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ फापाळे यांनी दिली.
सभेचे अध्यक्ष स्थान गोरक्षनाथ यांनी भूषविले. भाऊसाहेब खाडे व मिलिंद खेत्री यांनी प्रास्ताविकात शाळेच्या प्रगतीचा आढावा दिला.विद्यालयात होत असलेल्या विविध परीक्षा, उपक्रम व शैक्षणिक दर्जा या विषयी माहिती दिली. मंगेश तांबे व शिल्पा भालेराव यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले.
विद्यार्थ्यांचा आहार, आरोग्य, शिस्त, संस्कार व उपस्थिती याविषयी प्रतिक अकोलकर व लक्ष्मण दुडे तर अभ्यासाच्या सवयी,वेळापत्रक, शैक्षणिक सहल या विषयावर शरद माळवे व सोनाली माळवे यांनी मार्गदर्शन केले. गणवेश, दप्तराचे ओझे, वार्षिक नियोजन व मूल्यमापन या विषयांवर ब्रम्हदेव घोडके व विशाल चौधरी यांनी पालकांना मार्गदर्शन केले.
पालक मनोगतात डॉ. सविता फलके, अजित पानसरे, भिवा माळवे, डॉ. सुलक्षणा कुटे, राजेंद्र गायकवाड, गणपत डोंगरे आदी पालकांनी शाळेतून मिळणारे शिक्षण दर्जेदार आहे, चांगले संस्कार विदयार्थ्यावर करुन एक चांगला सुजाण नागरीक घडविण्याचे काम विद्यालय करत आहे. पालक- शिक्षक व विद्यार्थी यांचा सुसंवाद होणे गरजेचे आहे. पालक उद्बोधन वर्ग द्यावेत, प्रत्येक विद्यार्थी एक आदर्श नागरीक होणे हे प्रत्येक पालकाचे उद्विष्ट असे आवश्यक आहे त्यासाठी पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे अशी मते व्यक्त केली.
या सभेस संजय ढमढेरे, ज्ञानेश्वर पानसरे, प्रदिप गाढवे, पंकज घोलप, सोनाली कांबळे व बहुसंख्येने पालक उपस्थित होते.
या पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन पालक शिक्षक सभेचे सचिव अजित डांगे व संतोष कांबळे यांनी केले. आभार विठ्ठल डुंबरे, गोपाळ डुंबरे यांनी मानले.

