लोकमान्य टिळकांचे कार्य अनुकरनीय ….. नितीन पाटील
ओतुर – दि.४
लोकमान्य टिळक व साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य अनुकरनीय असल्याचे मत
श्री संत गाडगे महाराज मिशनचे संचालक नितीन पाटील यांनी विद्यालय येथे थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
श्री.गाडगे महाराज विद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली असल्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंगल साबळे यांनी सांगितले.
या प्रसंगी श्री गाडगे महाराज मिशन ओतुर शाखेचे संचालक नितीन पाटील मुख्याध्यापिका मंगल साबळे पर्यवेक्षक डी.आर.चौधरी,ज्येष्ठ शिक्षक एस. एम. कडाळे, वाय. एन. कोटकर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यालयातील बालवक्त्यांनी आपल्या भाषणातून लोकमान्य टिळक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली व त्यांच्या विचार कार्यातून आपण प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे सांगितले याप्रसंगी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची गाजलेली छक्कड ” माझीपण मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली ” ! सादर करून शिक्षक ए. बी. सोनोने यांनी उपस्थितांची मनं जिंकली संचालक नितीन पाटील यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य टिळकांचे कार्य याविषयी अनमोल माहिती दिली तर मुख्याध्यापिका यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांचे विचार नव्या पिढीने आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते क्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत बोंबटकार यांनी केले तर कैलास महाजन यांनी आभार मानले.