जुन्नर -(संजोक काळदंते)
ओतुरमधे शहीद दिनाचे औचित्य साधुन शहर भा.ज.प.तर्फे शहीद भगतसिंग,सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी कन्हैया कुमारची भगतसिंगशी तुलना करनारे कॉंग्रेसचे खासदार शशी थरुर,भारत माता की जय म्हणन्यास नकार देनारे असदुद्दीन ओवेसी,वारिस पठाण यांचा निषेध करणाऱ्या घोषणा देऊन याबाबतचे निवेदन सहाय्यक पोलिस निरिक्षक रविंद्र थोरात यांना देण्यात आले दरम्यान भा.ज.प.कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.भारत विरोधी वक्तव्य खपवून घेनार नाही तसेच यामुळे संपुर्ण भारतीयांच्या भावना दुखावल्याचे सांगत भा.ज.प.शहराध्यक्ष संतोष तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
याप्रसंगी भा.ज.प.शहर उपाध्यक्ष राजेंद्र वाडेकर,सरचिटनिस शंतनु जोशी,डॉ.भरत घोलप,सुभाष तांबे,सोमनाथ फाकटकर,भुषण मस्करे,शिवाजी डुंबरे,राहुल हुलवळे,बाळासाहेब डुंबरे,सुमेथ घोलप,मनिष वर्पे,सुजित डुंबरे,निखील घोगरे,वैभव रावत,शुभम डुंबरे,हेमंत तांबे आदी उपस्थित होते.
ओतुरमधे शहीदांना अभिवादन तर ओवेसी,थरुर यांचा निषेध
Date:

