ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात भाजपाची भूमिका विचारण्याचा अन्य पक्षांना नैतिक अधिकार नाही- विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर

Date:


मुंबई, दि. १९ जुलै – देशाच्या इतिहासात प्रथमच २६ ओबीसी केंद्रीय मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हे करून दाखविले आहे. त्यामुळे ओबीसी समाजाविषयी आम्हाला किती कळवळा हे दुसऱ्यांनी शिकवण्याचे कारण नाही. देशातील पंतप्रधान स्वतः ओबीसी समाजाचे आहेत, त्यामुळे त्या पक्षाला, नेत्याला ओबीसी समाजाविषयी शिकवण्याची गरज नाही, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप आमदार राजेश पवार आणि पूनम राजेश पवार यांच्या संकल्पनेतून नावारूपास आलेल्या ‘देवगाथा’ या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशनास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासहित विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. त्यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, भाजप हा एकमेव असा पक्ष आहे ज्यांनी ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात राज्यभर एकाच वेळेला हजार ठिकाणी आंदोलने उभी केली आणि ओबीसी समाजाच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत, हे ठासून सांगितले. त्यामुळे इतर पक्षाला किंबहुना त्या पक्षातील नेत्यांना भाजपला ओबीसी समाजाविषयीची भूमिका विचारण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे दरेकर यांनी ठणकावून सांगितले.
दरेकर म्हणाले, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेले आहे, त्याला सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. भाजप सरकारने किंबहुना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्याचे काम केले होते. तसेच माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाविषयी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले असून, स्वतंत्र बजेट ठेवण्यात आले, अनेक योजना आखल्या गेल्या. सरकार म्हणून समाजाला चांगल्या दिशेने ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे ओबीसी समाजाविषयी भाजपचे काही देणेघेणे नसल्याचे केवळ चित्र उभे केले जात असून केवळ आपले अपयश झाकण्यासाठी ओबीसी आरक्षण भाजपने घालवले, अशा प्रकारचा आरोप मविआकडून केला जात आहे. भाजप पक्षाला ओबीसी समाजाचे मोठे योगदान असून भाजप ओबीसी राजकीय आरक्षणासाठी लढा देत असून ओबीसी समाज एकत्रितपणे भाजपच्या झेंड्याखाली कसा येईल यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, ओबीसी मोर्चा राष्ट्रीय महामंत्री माजी खासदार संगमलाल गुप्ता, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार राजेश पवार, सौ. पूनम पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...