पुणे : पुण्यात शुक्रवारी रात्री उशीरा दोन ठिकाणी भीषण आग लागल्याची घटना घडली . खराडी येथे बाह्यवळण रस्त्यावर आणि एम जी रोडवरील फॅशन स्ट्रीटवर आग लागली आणि प्रचंड वित्तहानी झाली , शुक्रवारी रात्री पुण्यातील कॅम्प भागातील फॅशन स्ट्रीट एरियामध्ये आग लागल्याची घटना घडली . या भागात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत होत्या.
लष्कर परिसरातील प्रसिद्ध फैशन स्ट्रीट येथे शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजता भीषण आग लागली.शनिवारी पाहते १ वाजून १० मिनिटांनी हि आग पूर्णतः विझविण्यात अग्निशामक दलाला यश आले. घटनास्थळवर अग्निशामक दलाच्या 7 ते 8 गाड्या दाखल झाल्या होत्या.फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्यामुळे या भागामध्ये जाण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांना मोठी कसरत करावी लागली. हे अडथळे पार करून काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दरम्यान, या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसर असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

