पुणे, दि. ७:- जिल्हातील स्वयंसहाय्यता समुहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद पुणे व उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ९ व १० जून २०२२ रोजी जिल्हास्तरीय तांदुळ व डाळ महोत्सव २०२२-२३ चे नवीन जिल्हा परिषद, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.
नागरिकांनी मोठ्याप्रमाणात या प्रदर्शनास भेट देऊन महोत्सवात तांदूळ, डाळ आदींची खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला स्वयंसहाय्यता समुहाच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लागेल, असे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या सहसंचालक शालिनी कडू यांनी कळविले आहे.

