निर्यातदारांसाठी ‘वाणिज्य उत्सव’ संमेलनाचे पुणे येथे आयोजन

Date:

पुणे, दि. 24 सप्टेंबर 2021

‘आजादी का अमृत महोत्सव’ निमित्त केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महासंचालनालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, भारत सरकार व उद्योग संचालनालय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यातदारांचे एक दिवसीय ‘वाणिज्य उत्सव’  संमेलन शुक्रवार, दि. २४ सप्टेंबर २०२१ रोजी पुण्यातील डॉ. शिरनामे सभागृह, कृषि महाविद्यालय आवार, शिवाजीनगर,  येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय विदेश व्यापार विभागाचे संयुक्त महासंचालक श्री वरुण सिंह,राज्याचे उदयोग विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. प्रकाश रेंदाळकर आदि मान्यवर उपस्थित होते. राज्यातील सुक्ष्म,लघु,मध्यम उदयोजकांच्या उत्पादनाची निर्यात वाढावी.याकरता   राज्य सरकार लवकरच निर्यात धोरण आणणार असुन यातुन त्यांना मदत होणार आहे अशी माहिती श्री हर्षदीप कांबळे यांनी दिली.राज्यात औदयोगिक क्षेत्र मोठे असुन देशाच्या एकुण निर्यातपैकी चाळीस टक्के वाटा हा महाराष्ट्राचा आहे. येत्या काही दिवसात प्रत्येक जिल्हयातील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विविध उदयोगाकरता एक्स्पोर्ट हब उभारले जाणार आहे. असेही श्री कांबळे यांनी यावेळी सांगितले.या संमेलनात निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना औद्योगिक समुह,  शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक, केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमांचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य,  आदि सहभागी झाले होते. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...