महिला वर्गांला सक्षम करण्याकरता व्यवसाय प्रशिक्षण उपक्रमांतर्गत बेसिक टेलरिंग व ऍडव्हान्स टेलरिंग कोर्सेस’ आयोजन : सनी निम्हण.

Date:

पुणे- माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी आपल्या संकल्पनेतून आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. कोरोना च्या काळात कष्टकरी कुटुंबावर खूप मोठे आर्थिक संकट ओढविले आहे. बऱ्याच जणांचे कुटुंब आर्थिक संकटामुळे डबघाईला आले आहे.अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसाला रोजगार मिळणे गरजेचे आहे. उध्वस्त झालेले उद्योग यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आधार देणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन आपल्या कुटुंबासाठी मोठा हातभार लावणाऱ्या महिला वर्गांला सक्षम करण्याकरता माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी आपल्या संकल्पनेतून व्यवसाय प्रशिक्षण उपक्रमांतर्गत ‘बेसिक टेलरिंग व ऍडव्हान्स टेलरिंग कोर्सेस’ उपलब्ध करून दिला आहे.

याबद्दलची माहिती मॅकन्यूज ला देताना माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, कोरोनाकाळात अनेक उद्योग डबघाईस आले. बऱ्याच जणांना आपले उद्योगधंदे इच्छा नसतांना बंद करावे लागले. यात अनेक होतकरू माता-भगिनींचा देखील समावेश होता. अशा माता-भगिनींना परत त्यांच्या पायावर उभे राहता यावे याकरिता संजयगांधी वसाहत, लमाणतांडा, निम्हणमळा, सोमेश्वरवाडी, पाषाण भागातील महिलांसाठी सोमेश्वर फाऊंडेशन व यार्दी वस्ती विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय प्रशिक्षण उपक्रमांतर्गत ‘बेसिक टेलरिंग व ऍडव्हान्स टेलरिंग कोर्सेस’ उपलब्ध करून देत आहोत.

अधिक माहितीसाठी 8308123555 / 7030278349 या क्रमांकावर अवश्य संपर्क साधावा असे आव्हान त्यांनी महिला वर्गांना केले. सदर व्यवसाय प्रशिक्षण कस्तुरबा खादी महिला ग्राम विद्यालय अंतर्गत टेलरिंग प्रशिक्षक उज्वला जाधव आणि सिनियर टीम लीडर विजय पगारे व टीम लीडर संतोष शिर्सिकर यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छुकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण साठी १५ महिलांची एक बॅच केली जाणार आहे. दोन बॅच फुल झाल्या असून. अजून बॅचेस साठी नोंदणी सूरू आहे. या प्रशिक्षणाची फी २५०० रूपये असून या उपक्रमात केवळ ५०० रुपये फी आकरली जाईल. ज्या महिला प्रशिक्षणार्थी महिला हा प्रशिक्षण कोर्स पुर्ण करतील त्यांना सोमेश्वर फाउंडेशन च्या माध्यमातून हा कोर्स फ्री मध्ये करून दिला जाईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...