औंध येथे भरती मेळावा
पुणे दि.1- शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत कुशल कारागिरास आवश्यक असलेले पायाभूत प्रशिक्षण देण्यात येत असून आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी औद्यागिक प्रशिक्षण संस्था औंध येथे 4 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या योजनेअंतर्गत नामांकीत आस्थापनेत प्रशिक्षण देण्यात येणार असून केंद्र सरकारचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आस्थापनेकडून दरमहा प्रशिक्षण भत्ता (स्टायपेंड) देण्यात येईल. पात्र उमेदवारांनी मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहा. प्रशिक्षणार्थी सल्लागार विकास टेके आणि प्राचार्य प्रकाश सायगांवकर यांनी केले आहे.
घोले रोड येथेही भरती मेळाव्याचे आयोजन
आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकरीता सोमवार ४ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्रद्वारा शासकिय तांत्रिक विद्यालय घोले रोड पुणे येथे भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत नामांकीत आस्थापनेत प्रशिक्षण देण्यात येणार असून केंद्र सरकारचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. आस्थापनेकडून दरमहा प्रशिक्षण भत्ता (स्टायपेंड) देण्यात येईल. पात्र उमेदवारांनी मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अंशकालीन प्राचार्य पी. बी. देशमाने, व सहा प्रशिक्षणार्थी सल्लागार डब्ल्यु. व्ही. कोठेकर यांनी केले आहे.

