ओप्पो ए५३एस ५जी आला ..किंमत १४,९९० रुपये.

Date:

नवी दिल्ली: स्मार्ट डिव्हायसेसचा आघाडीचा जागतिक ब्रँड ओप्पोने आपला नवीन ओप्पो ए५३एस ५जी स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल केला आहे. सहज परवडण्याजोग्या किमतींच्या फोन्सच्या  श्रेणीतील हा सर्वात स्लीक आणि सर्वात किफायतशीर ५जी फोन आहे. ८ जीबी मेमरी असलेल्या या फोनमध्ये मीडियाटेकचा डिमेन्सिटी ७०० चिपसेट आहे. “बिग ऑन मेमरीहाय ऑन स्पीड” अर्थात प्रचंड मेमरी आणि प्रचंड वेग हे वैशिष्ट्य असलेल्या ओप्पोच्या ए सीरिज फोन्सच्या चाहत्यांकडे ओप्पो ए५३एस ५जी फोन असायलाच हवा. ओप्पो ए५३एस ५जी फोनची किंमत फक्त १४,९९० रुपयांपासून सुरु होते.  

अत्याधुनिक, भविष्यवेधी तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांना घेता यावा याच दिशेने  गेल्या काही महिन्यात ओप्पोने वेगवेगळ्या किंमत श्रेणीत वेगवेगळे ५जी फोन सादर केले आहेत.  प्रीमियम श्रेणीमध्ये ओप्पो रेनो५ प्रो ५जी, एफ१९ प्रो+ ५जी तर परवडण्याजोग्या  किमतींच्या श्रेणीमध्ये ओप्पो ए७४ ५जी आणि आता नवा ओप्पो ए५३एस ५जी अशी ओप्पोची  आगेकूच सुरु आहे. 

ओप्पो इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर श्री. दमयंत सिंग खानोरिया यांनी सांगितले, “नवीन ओप्पो ए५३एस ५जी फोन आणून आमच्या ए सीरिजमध्ये आणखी एक नवा ५जी फोन  सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.  या फोनमध्ये अनेक अशी शक्तिशाली वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे हा फोन संपूर्ण दिवसभर वापरता येतो, शिवाय हा ५जी नेटवर्कसाठी सज्ज आहे, भरपूर स्टोरेजचे लाभ मिळवून देतो आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या मनोरंजनाचा आनंद घेत असता तेव्हा हा फोन त्यामध्ये जराही व्यत्यय येऊ देत नाही.”

कोणत्याही स्मार्टफोनसोबत अखंडित नेटवर्क कनेक्टिविटी असणे अत्यावश्यक असते, युजर्सना स्मार्टफोनचा अनुभव कसा व किती मिळणार हे त्यावर अवलंबून असते. ओप्पो ए५३एस ५जी फोनमध्ये मीडियाटेकची डिमेन्सिटी ७०० चिपवर चालणारे ड्युएल सिम ५जी असल्यामुळे सर्वाधिक  वेगवान ५जी नेटवर्क कनेक्शनसाठी हा फोन अगदी अनुरूप आहे.   या फोनचे लाभ एवढ्यावरच थांबत नाहीत.  ड्युएल सिम ड्युएल स्टॅन्डबाय (५जी) मुळे तुम्ही  यामध्ये दोन ५जी सिम कार्ड्स वापरू शकता.  ओप्पो ए५३एस ५जीमधील ५जी क्षमतांमुळे काही  अतिरिक्त लाभ अनुभवता येतात.  या फोनसोबत तुम्हाला स्थिर नेटवर्क मिळते, ३६० अंश अँटेना तंत्रज्ञान चार एम्बेडेड अँटेना वापरत असल्याने ड्रॉप्ड कनेक्शन्सचा त्रास सहन करावा लागत नाही.  तुमचा फोन कसाही धरलेला असेल तरी फोनमध्ये सिग्नल असणारच.  ओप्पो ए५३एस ५जी तुमचे कनेक्शन जराही कमी होऊ देत नाही, यातील लिंकबूस्ट तुमचा फोन वाय-फाय आणि ५जी सिग्नल या दोघांनाही कनेक्ट करतो, त्यामुळे तुम्हाला तुमची भरपूर कामे काहीही व्यत्यय न येता करता येतात.  स्मार्ट ५जी ऑटोमॅटिक स्विचमुळे ५जी ते ४जी/एलटीई कनेक्शन यामध्ये आपोआप स्विच करते तर स्मार्ट ५जी ऑटोमॅटिक शेड्यूलिंगमुळे तुमच्या ऍपसाठी सर्वोत्तम नेटवर्क कॉन्फिगरेशननुसार नेटवर्क्स स्विच करू शकते, त्यामुळे तुमचे  कनेक्शन अचानक बंद होत नाही आणि फोनची बॅटरी संपण्याची देखील चिंता करावी लागत नाही.

 अल्ट्रालार्ज अर्थात प्रचंड मेमरी व स्टोरेज हे या फोनचे वैशिष्ट्य आहे.  मायक्रो एसडी स्लॉटमार्फत या फोनमध्ये १२८जीबी स्टोरेजचा अनुभव घेता येतो.  मेमरीमध्ये ६जीबी आणि ८जीबी असे दोन पर्याय आहेत.  ओप्पोची रॅम विस्तार सुविधा या फोनमध्ये देखील आहे.

ओप्पो ए५३एस ५जीची बॅटरी क्षमता तब्बल ५००० एमएएच एवढीअसल्यामुळे एक  दिवसापेक्षा सुद्धा जास्त काळ बॅटरी टिकून राहते.  याच्या आधीच्या फोन्सपेक्षा ओप्पो ए५३एस ५जी तीन तास जास्त वेळ वापरता येतो, ३७.८ तास टॉक टाइम, १७.७ तास व्हिडिओ प्लेबॅक यामध्ये मिळतो.  याशिवाय यामध्ये सुपर पॉवर सेव्हिंग मोड आहे, सीपीयू फ्रिक्वेन्सी आणि स्क्रीनचा ब्राईटनेस ऍडजस्ट करून फोनच्या बॅटरीचे वापराचे प्रमाण कमी केले जाऊ शकते, यामुळे फोनची बॅटरी कमी असताना देखील तुम्हाला तुमचे मेसेजिंग पूर्ण करता येते किंवा टॅक्सीसारखी सुविधा मिळवता येते.  जर तुम्ही तुमचा फोन रात्री चार्ज करायला विसरलात तर सुपर नाईटटाइम स्टॅन्डबायमुळे रात्रभर फक्त २% बॅटरी वापरली जाते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...