मंदिरे उघडा अन्यथा सर्व मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन करु; राज ठाकरे

Date:

मुंबई- जर मंदिरे उघडली नाही तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मंदिरांसाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. दहीहंडी उत्सवाच्या दिवशी मनसेने हि आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. याच संदर्भात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी केली आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी दहीहंडी केली साजरी
मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करु द्यावा अशी मागणी केली होती. मनसे अध्यक्षकांनी मनसैनिकांना दहीहंडी साजरी करण्याचे आदेश दिले. कोरोनाचा संसर्ग फैलावू नये यासाठी दहीहंडी साजरी करण्यास राज्य सरकारकडून मनाई करण्यात आली होती. मात्र, हे मनाई आदेश झुगारत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाण्यामध्ये दहीहंडी फोडली आहे. यानंतर पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे.

सर्व सण साजरे झालेच पाहिजे
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी सर्व सण उत्साहात साजरे झालेच पाहिजे अशी मागणी लावून धरली आहे. ते म्हणाले की, राज्यामध्ये सर्व काही सुरळीत सुरू आहे. यात्रा काढल्या जात आहेत, मेळावे होत आहेत. बिल्डर कामे करून घेण्यासाठी सरकारच्या लोकांना भेटत आहेत. त्यातून कोरोना पसरत नाही, मात्र सण-उत्सव आले की कोरोना पसरतो. हे सर्व जाणीवपूर्वक केले जातेय. सर्व सण साजरे झालेच पाहिजेत. सरकारला नियम लावायचेच असतील तर सगळ्यांसाठी एकच नियम लावायला हवा. एकाला एक नियम आणि दुसऱ्याला एक नियम असे चालणार नाही.’

…अन्यथा घंटानाद आंदोलन करु
मंदिरे उघडण्याविषयी राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळाले. मंदिरांच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आणि इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ‘मंदिरे उघडण्यात आलीच पाहिजेत. आजचा दिवस जाऊ द्या. यानंतर मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहे. यामध्ये आम्ही सविस्तर चर्चा करूच. सर्व मंदिरे उघडलीच पाहिजेत अन्यथा सगळ्या मंदिरांच्या बाहेर घंटानाद करू,’ असा इशाराच त्यांनी दिला. तसेच पुढे बोलताना म्हणाले की, घराबाहेर पडायला यांना भिती वाटते, त्यात आमचा काय दोष?

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...