पुणे:- ओपेल पूल आयोजित 2री जलतरण स्पर्धा पुणे महानगरपालिकेच्या कै. शंकरराव राजाराम कदम जलतरण तलावावर आयोजित करण्यात आली होती..या स्पर्धेत तब्बल 600 पेक्षा अधिक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला.. 32 इव्हेंट मध्ये तब्बल 92 स्पर्धकांनी पारितोषिके मिळवली.तसेच 4 लकी ड्रॉ पद्धतीने बक्षिसे काढण्यात आली.
नगरसेवक प्रकाश कदम,नगरसेविका अश्विनी भागवत,सामाजिक कार्यकर्ते संतोष धुमाळ,प्रभाकर (बाबा) कदम,वाई चे सामाजिक कार्यकर्ते किशोर गायकवाड भारती विद्यापीठ चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप
पत्रकार चंद्रकांत हंचाटे,मार्गदर्शक चंद्रकांत कदम, आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली..
नागरिकांनी व लहान मुलांनी आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी रोज दैनंदिन स्विमिंग करावे पोहण्यामुळे आरोग्य चांगले राहते असे प्रकाश कदम यांनी सांगितलेतर स्विमिंग या क्रीडा ला क्रिकेट व इतर खेळा सारखे महत्व दिले गेले पाहिजे. क्रीडा प्रकारात स्विमिंग मुळे आरोग्य चांगले राहतेच तर स्विमिंग मधून अनेक लहान मुले पुढे ऑलम्पिक सारख्या स्पर्धेची तयारी करून त्यात आपल्या देशाचे नाव मोठे करावे असे नगरसेविका अश्विनी भागवत यांनी सांगितले..
स्पर्धेचे सूत्रसंचालक आशिष जराड यांनी केले तर स्पर्धेचे आयोजन ओपेल पूल चे व्यवस्थापक सागर कदम,ओंकार जाधव, सिद्धार्थ आढाव,अनिल नावगैरे,अभिषेक लोणकर,सचिन रासगे,राहुल होळकर,संदीप बोरकर,यांनी केले..