पुणे-महापालिकेच्या ऑनलाईन मुख्य सभेत तब्बल १५०० कोटीचे ‘ऑफलाईन ‘टेंडर आले आणि विशेष म्हणजे हे ‘ऑफलाईन ‘टेंडर ऑनलाईन मतदानाने मंजूर करण्यात आले. १६ विभागीय कार्यालये, महापौरांच्या अँटीचेम्बर ला ऑनलाईन जोडून झालेल्या ऑनलाईन मतदानाने हा विषय सत्ताधारी यांनी मंजूर केला. देशभर डिजिटल इडिया चा आग्रह धरणारे मोदी सरकार आणि पुणे महापालिकेचे सत्ताधारी मात्र टेंडर ऑनलाईन न मागविता ऑफलाईन घेऊन मंजूर करवून घेतात यात काळेबेरे लपलेले असल्याचा संशय कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी व्यक्त केला आहे.
कॉंग्रेसचे नेते आबा बागुल म्हणाले,’हा अजब महापालिकेचा गजब कारभार’आहे . सारे पुणे आठवड्यातील सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरु असताना ,अनेक सभा समारंभ २०० व्यक्तींच्या सह्भागापर्यंत होत असताना , स्थायी समितीच्या बैठकीत काधीहीखंड पडू न दिलेल्या महापालिकेची मुख्य सभा मात्र नागरी सहभागा शिवाय अशा पद्धतीने गेली दीड वर्षे होत आहे या सभांमधील सारा कारभार संशयास्पद आहे.जायका चे ९०० कोटीचे टेंडर १५०० कोटीवर पोहोचले आहे आणि ते मंजूरही झाले आहे .हे धक्कादायक असले तरी याचा पुणेकरांना जाब हा सत्ताधाऱ्यांना द्यावाच लागणार आहे.
प्रत्यक्षात जायकाच्या या टेंडर बद्दल काय म्हणाले ,आबा बागुल ऐका ..पहा

