माजी नगरसेवकाच्या भूमाफिया टोळीतील एकाला पोलिसांनी केले गजाआड

Date:

पुणे- येवलेवाडी येथील जमिनीचा आपल्याबरोबरच व्यवहार करावा , यासाठी धमकावून गुंडांमार्फत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक विष्णु अप्पा हरिहर यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विष्णु अप्पा हरिहर, राहुल दत्ताराम खुडे (वय ३८, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी), प्रेम शाम क्षीरसागर (वय १८, रा. पर्वती दर्शन) व त्याचे इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वारगेट पोलिसांनी राहुल खुडे व प्रेम क्षीरसागर या रेकॉर्डवरील गुंडांना अटक केली आहे.

याबाबत सादीक सलीम खोजा (वय ३९, रा. बोट क्लब रोड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ११५/२२) दिली आहे. ही घटना सॅलिसबरी पार्कमधील गोल्डन बेकरीसमोर २७ मे रोजी रात्री साडेनऊ व ६ जून रोजी दुपारी चार वाजता घडली. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे त्यांची वडिलोपार्जित जमीन कोंढवा येवलेवाडी येथे आहे. तेथे त्यांना काही तरी व्यावसायिक प्रकल्प सुरु करायचा होता. पण, लॉकडाऊनमुळे ते व्यवसाय सुरु करु शकले नाही. २०२१ मध्ये विष्णू हरिहर व राहुल खुडे यांच्याकडे आले व ती जमीन त्यांना पाहिजे असल्याचे सांगितले. योग्य भाव दिल्यास व्यवहार करु असे बोलणे झाले. त्यानंतर ती जागा हरिहर यांनाच विकण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणू लागले. २७ जून रोजी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी यांचे मित्र नसीर अन्सारी यांच्या सॅलिसबरी पार्क येथील गोल्डन बेकरीजवळ विष्णु हरिहर व इतर लाठ्या, काठ्या, कोयते घेऊन आले. नसीर अन्सारी यांना दमदाटी करुन त्यांच्या कारची तोडफोड केली. स्थानिक राजकीय व्यक्ती एकनाथ ढोले यांनी मध्यस्थी केल्याने नसीर अन्सारी यांनी तक्रार केली नव्हती.

या घटनेनंतर १ जून रोजी फिर्यादी यांना राहुल खुडे यांचा फोन आला. त्यात खुडे याने फिर्यादींना धमकाविले.
येवलेवाडी येथील जमिनीचा व्यवहार विष्णु हरिहर बरोबर कर. नाही तर गोळ्या घालून मारेल, अशी धमकी दिली.
फिर्यादी यांनी त्याला महत्व दिले नाही.

फिर्यादी हे ६ जून रोजी दुपारी नसीर अन्सारी यांना भेटण्यासाठी गोल्डन बेकरी येथे आले होते.त्यांच्याशी व्यवहारासंबंधी मिटींग करुन ते बेकरीबाहेर लावलेल्या कारकडे आले असताना त्यांना काही अंतरावर राहुल खुडे हा मोटारसायकलवर आलेला दिसला.त्यांना पाहून तो मोटारसायकलवरुन उतरुन त्यांच्या दिशेने रिव्हाल्व्हरसारखे काही तरी काढून त्यांच्या दिशेने रोखून धरत होता.फिर्यादी हे घाबरून तातडीने कारमध्ये बसून जीवाच्या भितीने वेगात कार चालवत घरी आले.धाडस करुन ते महर्षीनगर पोलीस चौकी येथे तक्रार देण्यासाठी गेले.परंतु जीवाच्या भितीने राहुल खुडे व विष्णु हरिहर काही तरी अपाय करेल, या भितीने त्यांनी सविस्तर तक्रार दिली नाही.पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...