एमआयटी डब्ल्यूपीचा फरमाईश इंटरनेट रेडिओ लॉन्च
पुणे : “ एक देश एक आरोग्य पॉलिसी ही आज देशातील सर्वात मोठी गरज आहे. त्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व शाखांचे योग्य नियोजन करून नवी योजना तयार करावी लागणार आहे. अशा वेळेस आरोग्य, आनंद आणि शांतीसाठी समर्पित फरमाईश इंटरनेट रेडिओ समाजातील सर्व गरजापूर्ण करेल.” असा विश्वास जगविख्यात संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ.विजय भटकर यांनी व्यक्त केला.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फॉर्मसीच्या वतीने फरमाईश (पीस अॅण्ड हेल्थ) इंटरनेट रेडिओ लॉन्च करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या चॅनलला विश्वराज हॉस्पिटलचे सहकार्य आहे.
ऑनलाईन उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते. तसेच. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एन.टी.राव, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, स्कूल ऑफ फॉर्मसीचे अधिष्ठाता डॉ. ज्ञानेश लिमये, विश्वराज हॉस्पिटलचे सीईओ डॉ. विक्रम अग्रवाल आणि डॉ.बी.एस. कुचेकर हे उपस्थित होते.
डॉ. विजय भटकर म्हणाले, “ एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॉर्मा आणि इश या दोन गोष्टींनी मिळून हे रेडिओ चॅनल लॉन्च केले आहे. समाजाला शांतीची गरज असतांना याची सुरूवात होणे हे संजीवणी बूटी सारखे आहे. आनंदा शिवाय शांती नाही आणि शांती शिवाय आनंद नाही ही बाब समाजापर्यंत पोहचविण्यासाठी हे माध्यम उपयुक्त ठरणार आहे. सध्या आरोग्य शिक्षण आणि हेल्थकेअर सिस्टीम संदर्भातील खरी माहिती जनतेला मिळत नाही, ते देण्याचे काम या माध्यमातून होईल. त्याच प्रमाणे आयुर्वेदाची माहिती जनतेपर्यंत पोहचावावी. तंत्रज्ञानाच्या काळात टेली मेडिसनची गरज वाढत असतांना याचा मोठा आधार मिळणार आहे. त्याच प्रमाणे समाजाला देशी गाईचे महत्व कळणे गरजचे आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड म्हणाले,“ कोविड १९ मुळे समाजात भितीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विषयी जागृती गरजेचे आहे. फरमाईश रेडिओ चॅनलच्या माध्यमातून आरोग्य जागृती केली जाईल. योग व ध्यानधारणा यातून मनःशांती आणि विश्वशांती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. आनंदी जीवन हेच आरोग्याची गुरूकिल्ली आहे. यातूनच समग्र समाज निर्मितीस हातभार लागेल.”
डॉ.एन.टी.राव म्हणाले,“ फरमाईश रेडिओ एक कॅप्सूल सारखे काम करेल. या माध्यमातून आरोग्य, शांती बरोबरच एमआयटी डब्ल्यूपीयूतील सर्व गोष्टीची माहिती पुरविल्या जाईल. त्याच प्रमाणे समाजातील अन्य घटनांची फरमाईश पूर्ण केले जाईल.”
डॉ ज्ञानेश लिमये म्हणालेे,“ स्कूल ऑफ फॉर्मसीतर्फे शांती आणि आरोग्य हा मुख्य धागा पकडून फरमाईश इंटरनेटे रेडिओ चॅनल सुरू करण्यात आला आहे. याचा फायदा विद्यार्थी, शिक्षक व समाजाला होणार आहे. आरोग्य संदर्भात संपूर्ण माहिती मिळणार आहे. कौन बनेगा हेल्दी यासारखे कार्यक्रम प्रसारित होतील.”
डॉ. विक्रम अग्रवाल,“आज या चॅनलची खूप गरज आहे. समाजातील सर्व स्तरावरील व्यक्तींच्या आरोग्य संदर्भातील सर्व गोष्टींबरोबरच अन्य माहिती दिली जाईल. शाळा बंद असल्यामुळे लहानमुले घरी आहेत त्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्यासाठी उत्तम कार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.”
डॉ.बी.एस.कुचेकर म्हणाले,“देशातील हे पहिले कॉलेज असेल ज्यांनी या पद्धतीचे रेडियो इंटरनेट चॅनल सुरू केले आहे. यामुळे समाजात नक्कीच शांती स्थापनेस मदत मिळेल.”
प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी प्र्रास्ताविक केले.
प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अक्षय बाहेती यांनी आभार मानले.
एक देश एक आरोग्य पॉलिसीची गरज- डॉ. विजय भटकर
Date:

