अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आगामी ‘वी कॅन बी हिरोज’ या हॉलिवूड चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. यात प्रियांका वेगळ्या रुपात दिसतेय. तिने चित्रपटात हेडक्वार्टर चीफची भूमिका साकारली आहे. चित्रपटात तिने निगेटिव्ह पात्र साकारले आहे.
‘वी कॅन बी हीरोज’ हा चित्रपट सुपरहीरो थीमवर आधारित आहे. ज्यामध्ये मुले एलियनच्या हल्ल्यानंतर आपल्या आईवडिलांसह जगाला वाचवतात. हॉलिवूड सिनेसृष्टीतील महागड्या दिग्दर्शकांपैकी एक रॉबर्ट रॉड्रिग्ज यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या ख्रिसमसला नेटफ्लिक्सवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. प्रियांका ‘बेवॉच’ नंतर पुन्हा एकदा खलनायकाची भूमिका साकारत आहे.
या चित्रपटामध्ये प्रियांकाशिवाय क्रिश्चिय स्लेटर, सुंग कांग, पेड्रो पास्कल, बॉयड हॉलब्रूक आणि हॅली रीनहार्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रॉबर्ट रॉड्रिग्ज यांनी यापूर्वी ‘द एडव्हेंचर ऑफ शार्कबॉय एंड लावागर्ल इन 3-डी’, आणि ‘स्पाय किड्स’ हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

